आशाताई बच्छाव
जगद्ज्येाती महात्मा बसवेश्वर यांच्या जयंतीनिमित्त गुरुवारी शहरात भव्य शोभायात्रा
समाजबांधवांनी सहभागी होण्याचे महात्मा बसवेश्वर जयंती महोत्सव समितीचे आवाहन
वाशिम गोपाल तिवारी ब्युरो चीफ – बाराव्या शतकात जगातील पहिली लोकशाही संसद स्थापन करुन त्यात सर्व जातीधर्माच्या लोकांना सन्मानाचे स्थान देणारे विरशैव लिंगायत समाजाचे महान समाजसुधारक, क्रांतीसुर्य, जगद्ज्योती महात्मा बसवेश्वर महाराज यांच्या ८९४ व्या जयंतीनिमित्त महात्मा बसवेश्वर जयंती महोत्सव समितीच्या वतीने गुरुवार, १ मे रोजी साखरखेर्डा येथील ष.ब्र. श्री सद्गुरु सिद्धचैतन्य शिवाचार्य महाराज यांच्या दिव्य सानिध्यात शहरातुन भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले आहे.
जयंती कार्यक्रमाच्या नियोजनासाठी रविवार, २७ एप्रिल रोजी किशोरआप्पा पेेंढाकर यांच्या निवासस्थानी समितीची बैठक घेण्यात आली. या बैठकीत विविध पदाधिकार्यांवर शोभायात्रेची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. यामध्ये मंदिर सजावट, लायटींग, स्टेज, वाद्यबॅन्ड, भजनी मंडळ, रथ, महिला मंडळ फेटा, शोभायात्रा मार्गावर रांगोळी, फटाके, महिला केशरी साडी, पुरुष पांढरा ड्रेस, महाप्रसाद आदींसाठी विविध समित्या स्थापन करण्यात आल्या. महाप्रसाद समितीची जबाबदारी अशोकआप्पा वनगे, संजयआप्पा काष्टे, राहुलआप्पा टनमने, किशोरआप्पा पेंढारकर, दिगांबरआप्पा गुंडेकर, नंदुआप्पा देशमुख, विशालआप्पा रावले, सुरेशआप्पा घळे, दिपकआप्पा मिटकरी यांच्यावर सोपविण्यात आली. तर शोभायात्रा समितीमध्ये विजयआप्पा महाजन, पवनआप्पा ईसापुरे, दत्ताआप्पा चवरे, संदीपआप्पा फुटाणे, दिलीपआप्पा काष्टे यांचा समावेश करण्यात आला. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन दिलीपआप्पा काष्टे हे करतील. तसेच मंदिर स्टेज व्यवस्था स्वप्नील जिरवणकर, प्रशांतआप्पा बुकणे हे पाहतील. पिण्याच्या पाण्याची जबाबदारी विशालआप्पा कोष्टी यांनी स्विकारली. जयंती कार्यक्रमाला प्रमुख पाहूणे म्हणून खासदार, आमदार, जिल्हाधिकारी, पोलीस अधिक्षक, ठाणेदार आदींना निमंत्रित करण्यात आल्याची माहिती समितीचे कार्यकारी अध्यक्ष पवन इसापुरे यांनी दिली.
गुरुवार, १ मे रोजी सायंकाळी ५ वाजता श्रीराम मंदिर येथून शोभायात्रेला प्रारंभ होईल. ही शोभायात्रा छत्रपती शिवाजी महाराज चौक, काटीवेश, जुनी नगर परिषद, राजनी चौक, बाहेती गल्ली येथून मार्गस्थ होवून चिंतामणी मठ येथे शोभायात्रेचा समारोप होईल. या शोभायात्रेत काटा, सनगाव, पानकनेरगाव, शिरपुर जैन, पिंपळगाव, ब्रम्हा, राजाकिन्ही, कलबुर्गा, कडोळी, केकतउमरा येथील महिला भजनी मंडळ सहभागी होतील. याठिकाणी कार्यक्रमानंतर भव्य महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती उत्सव समितीच्या अध्यक्षा डॉ.सौ. अर्चना मेहकरकर यांनी बैठकीत दिली. तसेच सर्व समाजबांधवांनी या शोभायात्रेत व कार्यक्रमात बहूसंख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले.
बैठकीला जेष्ठ मार्गदर्शक काशिनाथआप्पा लाहोरे, सुरेश घळे, शुभम वनगे, स्वप्नील जिरवणकर, शुभम चोळे, विशाल रावले, अमर बुकशेटवार, ऋषिकेश महाजन, उमेश पातुरकर, मनोज पांगरे, राहुल तनमने, राहुल तनमने, सचिन फुटाणे, चंद्रकांत खेलुरकर, दिलीप काष्टे, दिपक मिटकरी, बाळासाहेब मेहकरकर, संजय काष्टे, देवानंद आलमवार, विशाल कोष्टी, संजय खेलुरकर, किशोर हडपकर, सौ. चित्रा लोखंडे, सौ. करुणा तनमने, सौ. रेखा रावले, सौ. मिनाक्षी आलमवार, विजय महाजन, प्रशांत बुकणे, गोपाल जिरवणकर आदींची उपस्थिती होती.