Home गडचिरोली इंदिरानगर व शहराच्या विकासासाठी सदैव कटीबद्ध माजी नगरसेवक प्रमोद पिपरे यांचे प्रतिपादन

इंदिरानगर व शहराच्या विकासासाठी सदैव कटीबद्ध माजी नगरसेवक प्रमोद पिपरे यांचे प्रतिपादन

30
0

आशाताई बच्छाव

1001215956.jpg

इंदिरानगर व शहराच्या विकासासाठी सदैव कटीबद्ध

माजी नगरसेवक प्रमोद पिपरे यांचे प्रतिपादन

गडचिरोली सुरज गुंडमवार ब्युरो चीफ 

नवदुर्गा उत्सव मंडळ व बाल गणेश मंडळ इंदिरानगर यांचे सौजन्याने खास मंडई निमीत्याने मौजा इंदिरानगर गडचिरोली येथे इंदिरा गांधी न.प. प्राथमिक शाळेच्या बाजुला आकर परिसरात बंद शामियानात धनंजय स्मृती रंगभुमी वडसा प्रस्तृत बाळा! मीच तुझी आई रे” या नाट्यप्रयोगाचे आयोजन नुकतेच करण्यात आले होते.

नाटकाचे उद्घाटन भाजपचे लोकसभा समन्वयक तथा माजी नगरसेवक प्रमोद पिपरे यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी माजी आमदार डॉ. नामदेव उसेंडी होते. प्रमुख पाहुणे म्हणून भाजप किसान मोर्चाचे प्रदेश सचिव रमेश मुरसे, भाजपचे जिल्हा सचिव अनिल कुनघाडकर, सामाजिक कार्यकर्ते संजय मांडवगडे, अॅड. बाळासाहेब आखाडे, गणेश कुनघाडकर, सागर सातपुते, गजानन नैताम, संदिप दुधबळे, देवानंद खोब्रागडे, देवराव बुरांडे, शुभम भरडकर, जयदेव नैताम, चंदाबाई बुरांडे, आदे, प्रकाश भांडेकर, संजय पिपरे, चंद्रकांत भोयर, नरेश खोबे, पोलिस पाटील भाष्कर कोठारे, स्वप्नील मडावी इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

नाटकाचे आयोजन मंडळाचे अध्यक्ष पंकज नैताम, उपाध्यक्ष कैलाश भांडेकर, सचिव महेश कुकुडकार, शुभम भांडेकर, अमित भांडेकर, नितीन बुरांडे, अनिल नैताम, राज बोबाटे, प्रकाश माहिष्कार, मनोज जवादे, सदानंद सुरनकर, सतिश शेंडे, शोएब पठाण, शुभम गिरसावळे यांच्या सहकार्याने उत्कृष्टरित्या पार पडले.

उद्घाटनाप्रसंगी मार्गदर्शन करतांना माजी नगरसेवक प्रमोद पिपरे यांनी सांगितले की, इंदिरानगर वॉर्ड हा भाजपाने वसविला असुन या वार्डाच्या विकासासाठी अनेक विकासकामे केलेली आहेत. वॉर्डात शाळेचे बांधकाम, पिण्याच्या पाण्याची टाकी, पाईपलाईन, रस्ते, नाल्या तसेच इलेक्ट्रीक पोल उभारले. याशिवाय वॉर्डातील तरूण युवक, नागरिक व महिलांना विविध योजनांचा लाभ मिळवून दिला. मुद्रा लोनच्या माध्यमातुन फुटपाथ दुकानदार व छोट्या व्यवसायिकांना उद्योग उभारण्यासाठी कर्ज उपलब्ध करून दिले. याचा फायदा इतरही युवकांनी घ्यावा. कामगार कल्याण कार्यालयातुन अनेक मजुरांना फायदा मिळालेला आहे. इतरही मजुर व कामगारांनी कामगार नोंदणी करून कामगारांच्या योजनांचा लाभ घ्यावा असेही त्यांनी सांगीतले.

लाडकी बहीण योजनेचा लाभ वॉर्डातील अनेक महिलांना मिळालेला आहे. नगर परिषदेकडुन कमी व्याज दरात अनेक महिला बचत गटांनी कज घेवून रोजगार सुरू करून फायदा घेतलेला आह. ज्या बचत गटांना आवश्यकता आहे, त्यांनी नगर परिषदेकडे अर्ज करून योजनेचा फायदा घ्यावा. तसेच आयुष्यमान भारत योजनेचे कार्ड काढुन नागरिकांनी आरोग्य योजनेचा फायदा घ्यावा. असेही यावेळी प्रमोद पिपरे यांनी सांगीतले. तसेच गडचिरोली शहरात 131 कोटींची नळयोजना कामाची निविदा निघाली असुन इंदिरानगर तसेच गडचिरोली शहरातील सर्व वॉर्डात दोन वेळेस स्वच्छ पाण्याच्या पुरवठा होणार आहे, असेही त्यांनी यावेळी सांगीतले.

Previous articleबारावीची परीक्षा उज्ज्वल भविष्यासाठी महत्वाची
Next articleमाहोरा येथील माजी आर्मी ऑफिसर सय्यद यासीन यांचे निधन
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here