Home बुलढाणा कर्जापाई शेतकऱ्याची आत्महत्या गळफास घेऊन शेतकऱ्यांनी संपवली जीवन यात्रा, सततची नापिकी व...

कर्जापाई शेतकऱ्याची आत्महत्या गळफास घेऊन शेतकऱ्यांनी संपवली जीवन यात्रा, सततची नापिकी व आर्थिक विवंचेतून घेतला जगाचा निरोप.

45
0

आशाताई बच्छाव

1000423567.jpg

कर्जापाई शेतकऱ्याची आत्महत्या गळफास घेऊन शेतकऱ्यांनी संपवली जीवन यात्रा, सततची नापिकी व आर्थिक विवंचेतून घेतला जगाचा निरोप.
युवा मराठा न्यूज मोताळा तालुका प्रतिनिधी संजय पन्हाळकर
चिखली तालुक्यातील मेरा बुद्रुक येथील शंकर झुंगाजी डोंगरदिवे वय 66 वर्ष यांनी आज सकाळी दिनांक 02 जुन 2024 रोजी त्यांच्या शेताशेजारील अशोक नारायण पडघान गट नंबर 168 यांच्या धुऱ्यावरील रामफळ या झाडाच्या दक्षिणेकडील फांदीला दोरीच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. त्यांच्याकडे सामायिक क्षेत्रामध्ये गट नंबर 210 व 213 मध्ये दोन एकर नऊ गुंठे जमीन आहे. सततची नापिकी, मालाचे पडलेले भाव, यांत्रिकी शेती झाल्यामुळे शेतीचा खर्च वजा बाकी काही राहत नाही. त्यामुळे त्यांचे आर्थिक परिस्थिती ढासळलेली होती. आता समोर पेरणीचे दिवस आले असताना आणखीन शेतीला खर्च कुठून लावायचा ,आर्थिक तडजोड कशी करायची या विवंचनेत त्यांनी जगाचा निरोप घेतला या घटनेची माहिती मिळताच महसूल विभागाचे कर्मचारी कोतवाल सचिन पडघान व मेरा बुद्रुक पोलीस पाटील बद्री पडघान यांनी अंढेरा पोलीस स्टेशनला माहिती दिली. माहिती मिळताच अंढेरा पोलीस स्टेशनचे कर्मचारी अमलदार गणेश देढे व वायाळ यांनी घटनास्थळी येऊन पंचा समक्ष पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी चिखली येथे सरकारी दवाखान्यात पाठवण्यात आला. आत्महत्याग्रस्त शेतकरी शंकर झुंगाजी डोंगरदिवे यांच्या पश्चात त्यांची पत्नी एक मुलगा आणि दोन मुली असा परिवार आहे. पुढील तपास अंढेरा पोलीस स्टेशनचे ठाणेदार विकास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली बीट जमदार देढे हे करीत आहे

Previous articleशालेय अभ्यासक्रमात मनुस्मृती आणि दासबोध नको वंचित बहुजन आघाडीची मागणी
Next articleबोराखेडी पोलीस स्टेशनच्या वतीने पाणपोई पोलीस निरीक्षक सारंग नवलकार यांचा उपक्रम
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here