Home गडचिरोली गडचिरोली शहरातील धानोरा रोड व आरमोरी रोडवरील ट्रॅव्हल्स पॉईंटमुळे अपघाताचा धोका वाढला।

गडचिरोली शहरातील धानोरा रोड व आरमोरी रोडवरील ट्रॅव्हल्स पॉईंटमुळे अपघाताचा धोका वाढला।

313

आशाताई बच्छाव

1002335658.jpg

गडचिरोली शहरातील धानोरा रोड व आरमोरी रोडवरील ट्रॅव्हल्स पॉईंटमुळे अपघाताचा धोका वाढला।

 

गडचिरोली, सुरज गुंडमवार ब्युरो चीफ: शहरातील धानोरा रोडवरील महिला रुग्णालयाच्या गेटजवळील ट्रॅव्हल्स पॉईंट तसेच आरमोरी रोडवरील पाण्याच्या टाकीसमोरील ट्रॅव्हल्स पॉईंट हे नागरिकांसाठी आणि रुग्णांसाठी गंभीर समस्येचे कारण ठरत आहेत. या ठिकाणी दररोज ट्रॅव्हल्स वाहनांचे अनियमितपणे उभे राहणे आणि प्रवाशांचे चढ–उतरण सुरू असल्याने परिसरात वाहतुकीची तीव्र कोंडी निर्माण होत आहे.

धानोरा रोडवरील महिला रुग्णालय परिसर हा नेहमीच रुग्ण आणि नागरिकांच्या वर्दळीने गजबजलेला असतो. त्यामुळे येथे उभ्या राहणाऱ्या ट्रॅव्हल्स वाहनांमुळे दुचाकीस्वार व वाहनचालकांना मोठा धोका निर्माण झाला आहे. नागरिकांच्या मते, काही चालक रस्त्याच्या मध्यभागीच प्रवासी थांबवून घेतात, ज्यामुळे वाहतुकीचा वेग खंडित होतो आणि कोणत्याही क्षणी गंभीर अपघात होण्याची शक्यता आहे.

स्थानिक नागरिकांनी प्रशासनाचे लक्ष वेधून घेतले असून, त्यांनी या सर्व ट्रॅव्हल्स पॉईंट्सवरील वाहनथांबे त्वरित हलवून स्वतंत्र ठिकाणी व्यवस्था करण्याची मागणी केली आहे.

वाहतूक विभाग व नगरपालिका प्रशासनाने या समस्येकडे तातडीने लक्ष देऊन गडचिरोली शहरातील नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक ती ठोस पावले उचलावीत, अशी मागणी नागरिकांनी व्यक्त केली आहे.

Previous articleनवेगाव (मूरखळा ) वार्ड क्रमांक 3 येथील घनकचरा विलगीकरण केंद्र नागरी वस्ती पासून दूर तयार करण्यात यावे!
Next articleअमरावती शहरात गुंडागर्दीची थैमान; भाजी बाजार येथे तरुण युवाचा खून.
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.