आशाताई बच्छाव
नवेगाव (मूरखळा ) वार्ड क्रमांक 3 येथील घनकचरा विलगीकरण केंद्र नागरी वस्ती पासून दूर तयार करण्यात यावे!
-डॉ. प्रणय भाऊ खुणे प्रदेश अध्यक्ष राष्ट्रीय मानवाधिकार संघटना
गडचिरोली सुरज गुंडमवार ब्युरो चीफ-गडचिरोली नवेगाव कॉम्प्लेक्स मुरखळा वार्ड क्रमांक 3 येथील ग्रामपंचायत नवेगाव अंतर्गत नागरी वस्ती व एन ए. टी. पी. लेआउट पडलेल्या बोडीजवळ प्रशासनाने या ठिकाणी घनकचरा विलगीकरण केंद्र तयार केलेले आहे आणि या घनकचरा विलगीरण केंद्रामुळे येथील जवळच असलेल्या नागरी वस्तीतील नागरिकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे या ठिकाणी टाकल्या जाणाऱ्या अनेक दुर्गंधीयुक्त वस्तू व पदार्थमुळे येथील सर्वसामान्य नागरिकांचे आरोग्य धोक्यात आलेले आहे यामुळे आज येथील स्थानिक नागरिक यांनी राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे प्रदेश अध्यक्ष डॉ. प्रनय भाऊ खुणे यांना सदर जागेवर प्रभागातील नागरिकांनी आमंत्रित केले आणि प्रत्यक्ष सदर जागा दाखवले व या ठिकाणी प्रत्यक्ष नागरिकांच्या वतीने निदर्शने करण्यात आले व डॉ.खुणे यांना निवेदन सुद्धा नागरिकांनी दिली.
येथील सर्वे क्रमांक 48 मधे सन 2022-23 मधे सदर घनकचरा विलगीकरण केंद्र तयार करून या ठिकाणी शेड बांधण्यात आले
या ठिकाणी घनकचरा विलगीकरण केंद्र सुरू आहे व येथेच या भागातील संपूर्ण घनकचरा आणून टाकल्या जात आहे आणि सदर विषय या भागातील नागरिकांसाठी आरोग्य करिता खूपच हानिकारक ठरत आहे त्यामुळे ग्रामपंचायत नवेगाव वार्ड क्रमांक 3 येथील नागरिकांनी या घनकचरा व्यवस्थापन केंद्र याचा प्रचंड विरोध केलेला आहे व सदर घनकचरा विलगीकरण केंद्र हलवण्यात यावे व या ठिकाणी असलेल्या संबंधित बोडीचे शुद्धीकरण करून सौंदर्यीकरण करण्यात यावे अशी मागणी मनीषा ताई मडावी जिल्हा अध्यक्ष महिला आघाडी ,राष्ट्रीय मानवाधिकार संघटना. स्नेहा मेश्राम शहर अध्यक्ष, भूषणा खेडेकर शहर उपाध्यक्ष, राणी गोपशेटवार शहर सचिव व
राऊत सर, पिंपळशेंडे सर, सुरेश मडावी सर,मसराम सर पवन गोपशेटवार हाडे मॅडम, कांबळे मॅडम,डोंगरे मॅडम, मडावी, बोंबाटे मॅडम पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.






