आशाताई बच्छाव
बुलढाण्यात बोगस मतदारावरून हायहोल्टेज ड्रामा.
युवा मराठा न्यूज बुलढाणा जिल्हा ब्युरो चीफ संजय पन्हाळकर
बुलडाणा :-बुलडाणा बुलढाणा, बुलढाणा नगर
पालिका निवडणूकीसाठी आज २ डिसेंबर रोजी सकाळी ७वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली आहे. अशातच मतदानाला केवळ दीड तास उलटत नाही तर बोगस मतदान करण्यासाठी सुरूवात झाली आहे. प्रभाग क्रमांक १५ साठी गांधी प्राथमिक शाळा येथे मतदान केंद्र आहे. येथे असलेल्या वैभव देशमुख नामक व्यक्तीच्या नावावर कोथळी ता. मोताळा येथील एका जणास उमेदवाराने मतदान केल्यानंतर पकडले आहे. त्याच्यासोबत आणखी एक जण आहे. कोथळी, इब्राहिमपूर येथून अन्य काही लोक बोगस मतदान करण्यासाठी आणले आहेत. दरम्यान घाटा खालून जवळपास दोन गाड्या भरून बुलढाण्यामध्ये बोगस मतदार आणले गेले आहेत. या गंभीर बाबीची दखल पोलीस प्रशासनाने घ्यावी, अशी मागणी काँग्रेस, पक्षाच्या वतीने करण्यात आली आहे. बुलढाण्यात अनेक मतदान केंद्रावर ग्रामीण भागातून बोगस मतदार आणून त्यांच्या करवी मतदार करून घेत असल्याचा आरोप काँग्रेसच्या उमेदवार दत्ता काकास यांनी केला आहे. याला पुष्टी करणारे अनेक व्हिडिओही समाज माध्यमात व्हायरल होत आहेत. तर काही मतदारांना बोगस मतदान करताना पकडण्याची ही माहिती आरोप करते उमेदवारांनी दिली आहे.बुलढाणा येथील आयटीआय मतदान केंद्रावर आज सकाळी बोगस मतदानाचा प्रयत्न करणाऱ्या मतदाराला पोलिसांनी पकडले होते. मात्र आमदार संजय गायकवाड यांचे पुत्र कुणाल गायकवाड व पुतण्या श्रीकांत गायकवाड यांनी पोलिसाच्या हाताला हिसका देऊन बोगस मतद-ाराला पळवले. याप्रकरणी आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल करुन दोषींवर कडक कारवाई करावी.
विजयराज शिंदे, भाजप जिल्हाध्यक्ष बुलढाणा
बुलढाणा येथे स्थानिक आमदार पुत्र व पुतण्या नगरसेवक उमेदवार आहेत बोगस मतदार पकडला गेला असता पोलिसांना अडथळा निर्माण करून लोटपाट केली व आरोपीस पळून लावले. गुंडांना राजआश्रय आह? की गुन्हे दाखल होणार? केवळ पकडल्या गेलेल्या बोगस मतदारांवर कारवाई करून भागणार नाही या गावगुंडांना देखील आवर धालने आवश्यक आहे !
हर्षवर्धन सपकाळ, प्रदेशाध्यक्ष काँग्रेस






