Home नाशिक नाशिक नगरीत नवदुर्गां, पत्रकार व डॉक्टरांचा ही पुरस्काराने सन्मान

नाशिक नगरीत नवदुर्गां, पत्रकार व डॉक्टरांचा ही पुरस्काराने सन्मान

184

नाशिक नगरीत नवदुर्गां, पत्रकार व डॉक्टरांचा ही
पुरस्काराने सन्मान

सुप्रसिद्ध रामायणाचार्य हभप भास्कर नाना रसाळ आहेरगाव यांची प्रमुख उपस्थिती

दैनिक युवा मराठा
निफाड नाशिक तालुका प्रतिनिधी रामभाऊ आवारे

विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिला शक्तीचा सन्मान व्हावा त्यांनी केलेल्या कार्याची कौतुक व्हावं त्याचबरोबर पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या नाशिक जिल्ह्यातील निवडक पत्रकारांचा ही सन्मान व्हावा तसेच आरोग्य सेवा देणारे आरोग्य दूत डॉक्टर यांचाही या पुरस्कार सोहळ्यामध्ये सन्मान व्हावा हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून नाशिक येथे वंदे महाराष्ट्र टिव्ही मिडिया परीवार तर्फे राज्य स्तरीय नवदुर्गा पुरस्कार व भारत श्री राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. अल्पावधीतच नाशिक जिल्ह्यात नावलौकिक मिळविलेल्या वंदे महाराष्ट्र टिव्ही मिडिया परीवार तर्फे राज्य स्तरीय नवदुर्गा पुरस्कार व भारत श्री राष्ट्रीय पुरस्कार,आदर्श पत्रकार पुरस्कार सोहळा मोठ्या उत्सवात संपन्न झाला.
नवदुर्गा पुरस्कार वितरण सोहळ्याच्या कार्यक्रम अध्यक्षस्थानी महाराष्ट्रातील नामवंत रामायणाचार्य तथा अखिल भारतीय वारकरी मंडळाचे विभागीय अध्यक्ष तसेच शिवसेना धर्मवीर अध्यात्मिक सेना नाशिक जिल्हा समन्वयक हभप भास्कर नाना रसाळ आहेरगाव होते. तर कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी म्हणून मा सभापती माधुरीताई बोलकर सातपुर तसेच प्रमुख पाहुणे म्हणून
वंदे महाराष्ट्र टिव्ही मिडिया चे मुख्य संपादक छगनभाऊ कोळेकर ,ग्राहक उपभोक्ता संरक्षण समिती अध्यक्ष दादासाहेब केदारे आदी उपस्थित होते.
सर्वप्रथम उपस्थित मान्यवरांचे प्रवेशद्वाराजवळ नारीशक्तीच्या वतीने औक्षण करण्यात आले. त्यानंतर स्वागत गीत होऊन मान्यवरांच्या शुभहस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले. उपस्थित सर्व मान्यवरांचा वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया परिवाराच्या वतीने यथोचित सन्मान करण्यात आला. मान्यवरांनी आपल्या मनोगतातून नारीशक्तीच्या सन्मानाबद्दल कौतुक करून पुरस्कारार्थींना शुभेच्छा दिल्या. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष रामायणाचार्य हभप भास्कर नाना रसाळ यांनी नारी शक्तीचा सन्मान वंदे महाराष्ट्र टीव्ही मिडीया परिवाराच्या वतीने होणे एक गौरवास्पद बाब असून विविध क्षेत्रातील मान्यवरांचा या ठिकाणी करत असलेल्या सन्मान निश्चितच भूषणावह आहे असे आपल्या मनोगतातून त्यांनी प्रतिपादन केले. यावेळी ५० नारीशक्तीचा नवदुर्गा पुरस्काराने नाशिक जिल्ह्यातील १० निवडक पत्रकारांचा आदर्श पत्रकार पुरस्काराने व ५ डॉक्टरांचा भारत श्री राष्ट्रीय पुरस्काराने मान्यवरांच्या शुभहस्ते सन्मानपत्र, सन्मानचिन्ह देऊन यथोचित सन्मान करण्यात आला.
नवदुर्गा पुरस्कार सोहळ्याचे आयोजन वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया परिवाराचे उपसंपादक महाराष्ट्र राज्य रमेशगिरी गोसावी ,नाशिक जिल्हा उपसंपादक रामचन्द्र ताठे ,नाशिक रोड प्रतिनिधी मयुरेश केंदळे ,नाशिक शहर प्रतिनीधी हर्षल पवार ,सिन्नर प्रतिनिधी प्रवीण पवार, मालेगांव उपसंपादक तुकाराम गवळी ,सिडको प्रतिनिधी
इरतकर साहेब ,वारकरी मंच प्रदेश प्रसिद्धीप्रमुख तथा वरीष्ठ पत्रकार रामभाऊ आवारे सर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. महाराष्ट्रातील सामाजिक, शिक्षक, डॉक्टर, व्यवसाय, गृहिणी आशा सर्व क्षेत्रात कार्यरत असणा-या महिलांचा या सोहळ्यात पुरस्काराने सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे अतिशय सुंदर व समर्पक शब्दांत सुत्रसंचलन व आभार सौ प्राजक्ता जठार यांनी केले. कार्यक्रमाच्या शेवटी सर्व महिलांचा ग्रुप फोटो घेण्यात आला व सर्वांना नाष्टा व चहापाणी देण्यात आला.

Previous articleबुलढाण्यात बोगस मतदारावरून हायहोल्टेज ड्रामा.
Next articleउगाव येथील विद्यालयात आनंद मेळावा उत्साहात संपन्न
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.