Home भंडारा वृक्ष भेट देऊन केली रमजान ईद साजरी

वृक्ष भेट देऊन केली रमजान ईद साजरी

16
0

आशाताई बच्छाव

1000282143.jpg

वृक्ष भेट देऊन केली रमजान ईद साजरी

संजीव भांबोरे
भंडारा( जिल्हा प्रतिनिधी):- स्पर्धेच्या युगात प्रत्येक गोष्टींची स्पर्धा लागलेली आहे. त्यात मानवांनी स्वत:च्या स्वार्थासाठी वृक्षाची मोठ्या प्रमाणात कत्तल केली आहे. त्यामुळे ग्लोबल वॉर्मिंग सारख्या समस्या निर्माण झाल्या आहेत. अशा अनेक समस्यांवर मात करण्यासाठी वृक्षारोपण करणे गरजेचे आहे.
च्या विचार आत्मसात करण्यासाठी युवकांनी शिवरायांच्या कार्याचे आदर्श ठेवावे असे प्रतिपादन चंद्रपूर येथील रफी अहमद किंदवाई ज्युनियर कॉलेजचे प्राध्यापक मोहम्मद शाहनवाज यांनी केले.
ते समीर वर्ल्ड कॉम्प्युटर एज्युकेशन व मित्र मंडळी यांच्या संयुक्त विद्यमाने रमजान ईद निमित्त वृक्ष भेट देतांना बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ग्रामीण युवा प्रागतिक मंडळाचे सचिव अविल बोरकर होते. प्रमुख पाहुणे म्हणून शिक्षण रत्न पुरस्कार प्राप्त राहुल मेश्राम, खोकरला पतंजलि योग समितीचे अध्यक्ष यशवंत बिरे, राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त तथा सेवानिवृत्त शिक्षक मोहम्मद शरिफ शेख, सामाजिक कार्यकर्ते विलास केजरकर, चंद्रपूर येथील रफी अहमद किंदवाई ज्युनियर कॉलेजचे प्राध्यापक मोहम्मद शाहनवाज, सेवा निवृत्त केंद्र प्रमुख प्रदिप काटेखाये, समीर वर्ल्ड कॉम्प्युटर एज्युकेशनचे संचालक समीर नवाज, तोषिप शेख, विभांशु तिरपुडे, रुमा शिकवणी केंद्राचे संचालक रूमाना शेख इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
त्यावेळी उपस्थित मान्यवरांनी रमजान ईद निमित्त हिंदू मुस्लिम बांधवांनी एकमेकांना गळा भेट देऊन आलिंगन दिले. थोर समाजसुधारक महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जीवनावर विविध मार्मिक उदाहरण देऊन मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विलास केजरकर यांनी केले तर उपस्थितांचे आभार राहुल मेश्राम यांनी मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता अनिकेत शेंडे, अनाबिया शेख, नासीर पटेल, अरशान शेख, मिहीर सतदेवे, तौसीफ शेख, किर्ती निपाणे, शायना शेख, भुसरा शेख इत्यादी परिसरातील नागरिकांनी सहकार्य केले.

Previous article“युवा बेरोजगारों की समस्या मिडीया कभी नहीं दिखाऐगी” – राहुल गांधी
Next articleडॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आत्मसात करण्याची व संविधान घरोघरी पोहोचविण्याची गरज –आंबेडकरी विचारवंत नितीन कारेमोरे
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here