आशाताई बच्छाव
“युवा बेरोजगारों की समस्या मिडीया कभी नहीं दिखाऐगी” – राहुल गांधी
लाखोंच्या जनसागरात साकोलीत कॉंग्रेस स्टार नेते राहुल गांधींची सभा संपन्न
संजीव भांबोरे
भंडारा (जिल्हा प्रतिनिधी)”टिव्ही पर कभी भी युवाओं बेरोजगारों की समस्या मिडिया दिखाएंगे ही नहीं, बस आपको अंधकार में रखकर आपके जेब का पैसा निकाल लिया जाता है और यह बडे टिवी मिडिया मे जो कार्यरत है उनमे एक भी ना ओबीसी है, ना एस सी है ना कोई साधारण परीवार का है” बस आपको उलझां कर रखा हुआं है यह भाजपा सरकार ने” असा सणसणीत आरोप आज शनिवार १३ एप्रिल साकोलीत राष्ट्रीय कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी जनसभेत केला. सभा गजानन महाराज मंदिर ग्राऊंडवर संपन्न झाली. येथे ८५ हजार ते १ लाखांपर्यंत स्थानिक आणि भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्रातील, नागपूर, गडचिरोली, चंद्रपूर जिल्ह्यातूनही जनता आली होती.
पुढे ते म्हणाले की, या स्टेजवर दोन्ही बाजूला कॉंग्रेसच्या लावलेला जाहिरनाम्यात सर्वात महत्वाचे ५ मुद्दे दिले आहेत. हा जाहीरनामा तरी मिडिया टिवी वाले दाखवू शकतील काय.? बेरोजगारी, शेतकरी समस्या न दाखविता भलत्याच विषयात जनतेला गुंतवून मूर्ख बनविले जाते आहे, एससी एसटी, आदिवासी, ओबीसी समाजांना सरकारमध्ये जागा नाही. जेवढी लोकसंख्या तेवढाच अधिकार त्या समाजाला मिळाला पाहिजे यासाठी काँग्रेस सरकार सत्तेत येताच जातनिहाय जनगणना व आर्थिक, सामाजिक सर्वेक्षण करण्याचे क्रांतीकारी काम करणार आहे. मोदी सरकारवर हल्लाबोल करत राहुल गांधी म्हणाले की, सरकार मोदींचे नाही तर अदानीचे आहे, एका अरबतीचे सरकार आहे व नरेंद्र मोदींनी १० वर्षात त्यांच्यासाठीच काम केले. असा घणाघात राहूल गांधी यांनी केला. यावेळी मंचावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आ. नाना पटोले, विधिमंडळ काँग्रेस पक्षनेते बाळासाहेब थोरात, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील, खासदार चंद्रकांत हंडारे, गोवा प्रभारी माणिकराव ठाकरे, भारतीय काँग्रेस कमिटी सचिव आशिष दुआ, माजी मंत्री सतीश चतुर्वेदी, भंडारा गोंदिया लोकसभा उमेदवार डॉ. प्रशांत पडोळे, गडचिरोली चिमूर काँग्रेस उमेदवार डॉ. नामदेव किरसन, नागपूरचे उमेदवार आ. विकास ठाकरे, चंद्रपूर उमेदवार प्रतिभा धानोकर, प्रदेश उपाध्यक्ष संघटन व प्रशासन नाना गावंडे, अल्पसंख्याक विभागाचे प्रदेशाध्यक्ष आ. वजाहत मिर्झा, आ. अभिजीत वंजारी, आ. सहसराम करोटे, माजी खा. मधुकर कुकडे, माजी खा. खुशाल बोपचे, भंडारा जिल्हा काँग्रेस अध्यक्ष मोहन पंचभाई, यांच्यासह विदर्भातील इंडिया आघाडीतील सर्व घटक पक्षांचे नेते, पदाधिकारी उपस्थित होते.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले यावेळी म्हणाले की, काँग्रेसच्या जाहिरनाम्यात जातनिहाय जनगणना करण्याचे आश्वासन दिले आहे तसेच मागास, आदिवासी, ओबीसी समाजाच्या हितासाठी आर्थिक, सामाजिक सर्वेक्षणही केले जाणार आहे. याचा लाभ भंडारा जिल्ह्याला होणार असून या जिल्ह्यात एससी, एसटी, भटके विमुक्त, आदिवासी व ओबीसी समाजाची लोकसंख्या जास्त आहे. काँग्रेसच्या जाहिरनाम्यात शेतकरी, कामगार, तरुण, महिला व गरिबांसाठी आश्वासने दिली आहेत त्याबद्दल राहुल गांधी यांना मनापासून धन्यवाद देतो असे वक्तव्य केले.
या विशाल जनसभेत भारतीय राष्ट्रीय काँग्रेस भंडारा जिल्हा, साकोली तालुका, शहरातील पदाधिकारी, महिला कॉंग्रेस, युवक काँग्रेस, कामगार सेल, एन एस यु आय, सेवादल, राष्ट्रवादी काँग्रेस ( शरद पवार ), शिवसेना – युवासेना ( उध्दव बाळासाहेब ठाकरे ), आरपीआयचे व इंडिया गठबंधनचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी सभास्थळी आयोजन कार्यात विशेष सहकार्य केले.
या सभेसाठी साकोली शहरात ९०० जवळपास पोलीसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. यात जिल्हा पोलीस अधिक्षक लोहित मतानी, गुन्हे शाखा पोलीस अधिक्षक ईश्वर कातकडे, सहाय्यक पोलीस अधिक्षक सुशांतकुमार सिंह, साकोली पोलीस निरीक्षक रमाकांत कोकाटे यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक, पोलीस नायक, पोलीस हवालदार, वाहतूक पोलीस, महिला पोलीस, पोलीस शिपाई, सीआरपीएफ, आरपीएफ, बॉम्ब शोधक व नाशक पथक नागपूर, दंगाधोपा नियंत्रण पथकांसह भंडारा, नागपूर, वर्धा, गोंदिया जिल्ह्यातील विशेष सुरक्षा दल साकोलीत आले होते.






