• Home
  • 🛑 नवीन नियमांनंतर Mutual Fund मध्ये गुंतवलेल्या तुमच्या पैशांवर काय परिणाम होणार? 🛑

🛑 नवीन नियमांनंतर Mutual Fund मध्ये गुंतवलेल्या तुमच्या पैशांवर काय परिणाम होणार? 🛑

🛑 नवीन नियमांनंतर Mutual Fund मध्ये गुंतवलेल्या तुमच्या पैशांवर काय परिणाम होणार? 🛑

✍️ मुंबई ( साईप्रजित मोरे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज ).

मुंबई, 14 सप्टेंबर : ⭕ मार्केट रेग्यूलेटर सेबीने (SEBI-Securities and Exchange Board of India) म्युच्यूअल फंड्सच्या मिडकॅप कॅटेगरीसाठी नवीन नियम जारी केले आहेत. नवीन नियमांनुसार, एका मल्टीकॅप फंडला शेअर बाजारात एकूण 75 टक्के रक्कम गुंतवावी लागेल. आतापर्यंत ही मर्यादा 65 टक्के होती. त्याचप्रमाणे या 75 टक्के रकमेपैकी 25 टक्के लार्जकॅप शेअर्समध्ये गुंतवावे लागतील. तर 25 टक्के मिडकॅप आणि 25 टक्के स्मॉलकॅपमध्ये गुंतवावे लागतील. या निर्णयामुळे शेअर बाजारातील गुंतवणुकदारांना मोठा फायदा होईल. जानेवारी 2021 पासून नवे नियम लागू होणार आहेत.

➡️ म्युच्यूअल फंड्स म्हणजे काय?

सोप्या शब्दात सांगायचे झाले तर, अनेक गुंतवणूकदारांचे पैसे एकत्र केले जातात. फंड मॅनेजर हे पैसे शेअर बाजार किंवा अन्य ठिकाणी जसे की, सरकारी बाँड्स यामध्ये गुंतवतात. म्युच्यूअल फंड्स अॅसेट मॅनेजमेंट कंपन्यांद्वारे (AMC) मॅनेज केले जातात. प्रत्येत एएमसीमध्ये साधारणपणे अनेक म्युच्यूअल फंड स्कीम असतात.

➡️ सेबीने कोणते नियम बदलले?

सेबीच्या नवीन सर्क्यूलरच्या मते, एका मल्टीकॅप फंडला शेअर बाजारात एकूण 75 टक्के रक्कम गुंतवावी लागेल. आतापर्यंत ही मर्यादा 65 टक्के होती. त्याचप्रमाणे या 75 टक्के रकमेपैकी 25 टक्के लार्जकॅप शेअर्समध्ये गुंतवावे लागतील. तर 25 टक्के मिडकॅप आणि 25 टक्के स्मॉलकॅपमध्ये गुंतवावे लागतील.

➡️ मिडकॅप फंड्स कोणते आहेत?

मिडकॅप म्युच्यूअल फंड स्कीम मध्यम आकाराच्या कंपनीमध्ये गुंतवणूक करतात. या कंपन्यांमध्ये मोठ्या आकाराची कंपनी बनण्याची पात्रता असते. यामध्ये जोखीम आणि अस्थिरता जास्त असते, मात्र अधिक रिटर्नची देखील अपेक्षा असते. जर तुम्ही अधिक जोखीम नाही उचलू शकत किंवा दीर्घकाळसाठी गुंतवणूक करत नसाल तर लार्जकॅप किंवा मल्टीकॅप यांसारख्या कमी जोखमीच्या पर्यायात पैसे गुंतवणे फायद्याचे आहे.

➡️ मिडकॅप कंपनी कोणती हे कसे समजते?

मार्केट कॅपच्या आधारे शेअर बाजारातील पहिल्या 100 कंपन्यांना लार्जकॅप कंपनी म्हटले जाते. या यादीमध्ये 101 ते 250 क्रमांकावर असणाऱ्या कंपन्या मिडकॅप आहेत. 251 च्या पुढे असणाऱ्या सर्व कंपन्या स्मॉल कॅप कॅटेगरीमध्ये येतात.

➡️ सेबीच्या निर्णयानंतर गुंतवणूकदारांवर काय परिणाम होईल?

तज्ज्ञांच्या मते, मल्टीकॅप संदर्भातील नवीन सर्क्यूलर त्याचे चांगले लेबल दर्शवतो. सध्या या फंड्समध्ये अधिकतर हिस्सा लार्जकॅपचा आहे. त्यामुळे मल्टीकॅप आणि लार्जकॅपमध्ये फरक करणे कठीण झाले आहे. सध्याच्या काळात प्रत्येक मल्टीकॅपमध्ये 70 टक्के लार्ज कॅप स्टॉक्स आहेत. यामध्ये मिड कॅप 22 टक्के तर स्मॉल कॅप 8 टक्के आहे. असा अंदाज व्यक्त केला जात आहे की, कमी काळामध्ये मिड आणि स्मॉल कॅपमध्ये लिक्विडिटीची समस्या निर्माण होऊ शकते. कारण आता फंड मॅनेजर वेगाने गुंतवणूक वाढवतील. अशावेळी कमी लिक्विडिटी (शेअरमध्ये कमी व्यवहार) मॅनेजर्सची चिंता वाढवू शकते.⭕

anews Banner

Leave A Comment