• Home
  • 🛑 मुंबई पोलिसांची कामगिरी चांगलीच; तरीही सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत: देशमुख 🛑

🛑 मुंबई पोलिसांची कामगिरी चांगलीच; तरीही सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत: देशमुख 🛑

🛑 मुंबई पोलिसांची कामगिरी चांगलीच; तरीही सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत: देशमुख 🛑

मुंबई ( साईप्रजित मोरे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )

मुंबई, 20 ऑगस्ट : ⭕ सुशांतसिंह प्रकरणाचा तपास सीबीआयकडे देण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतर महाराष्ट्र सरकारला मोठा धक्का असल्याचं समजलं जात आहे. राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचं स्वागत केलं असून, सीबीआयला हवं ते सहकार्य सरकारकडून करण्यात येईल, असं त्यांनी म्हटलं आहे.

सुशांतसिंह प्रकरणाची चौकशी सीबीआयकडे देण्याची मागणी होत असताना अनिल देशमुख ठामपणे मुंबई पोलिसांच्या पाठीशी उभे राहिले होते. यावेळीही त्यांनी ‘मुंबई पोलिसांनी अत्यंत चांगली कामगिरी केली असून न्यायालयानंही तपासात दोष आढळला नसल्याचं म्हटलं आहे आणि मुंबई पोलिसांसाठी ही अभिमानाची बाब आहे,’ असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.

‘सुशांतसिंह आत्महत्येप्रकरणी विरोधी पक्षातील नेते राजकारण करण्याचा प्रयत्न करत आहे. बिहारमध्ये लवकरच निवडणूका होणार आहेत त्यानुषंगानेचं राजकारण केले जात आहे,’ असाही पुनरुच्चार त्यांनी केला. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर राज्य सरकार पुनर्विचार याचिका दाखल करणार करणार का हा प्रश्न विचारला असता, त्यांनी याबाबत उत्तर देणं टाळलं आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वीच अनिल देशमुख यांनी मुंबई पोलिसांची पाठराखण केली होती. मुंबई पोलीस या प्रकरणाचा व्यावसायिक पद्धतीनं तपास करत आहेत. सर्व बाजू तपासून पाहिल्या जात आहेत. त्यामुळं सीबीआय तपासाची गरज नाही, असं देशमुख यांनी स्पष्ट केलं होतं. याबाबतीत कुणीही राजकारण करू नये, असं त्यांनी विरोधकांना सुनावलं होतं.

अनिल देशमुख यांनी सीबीआय चौकशीला नकार दिल्यानंतर भाजप आक्रमक झाली आहे. अनिल देशमुख यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी विरोधकांकडून करण्यात येत आहे. मुंबईच्या पोलीस आयुक्तांनी सुशांत प्रकरणात तब्बल दोन महिने साधा एफआयआर नोंदवून न घेणं हे दुर्दैवी आहे. ह्याची जबाबदारी घेऊन महाराष्ट्रचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी राजीनामा द्यावा,’ अशी मागणी भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केली आहे.⭕

anews Banner

Leave A Comment