Home अमरावती अमरावतीत पाणी प्रश्नावर नागरिक आक्रमक, घागर फोडो आंदोलनाचा इशारा. तक्रार करूनही महाराष्ट्र...

अमरावतीत पाणी प्रश्नावर नागरिक आक्रमक, घागर फोडो आंदोलनाचा इशारा. तक्रार करूनही महाराष्ट्र जीवन प्राधिकरण वीभागाचे दुर्लक्ष.

26
0

आशाताई बच्छाव

IMG_20240404_184513.jpg

अमरावतीत पाणी प्रश्नावर नागरिक आक्रमक, घागर फोडो आंदोलनाचा इशारा. तक्रार करूनही महाराष्ट्र जीवन प्राधिकरण वीभागाचे दुर्लक्ष.
दैनिक युवा मराठा
पी.एन. देशमुख
अमरावती जिल्हा विभागीय संपादक
अमरावती. अमरावती शहरातील काही भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी टंचाई असून, अस्वच्छ पाणीपुरवठा होत आहे. या संदर्भात अनेक वेळा तक्रारी करूनही महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाने याची दखल घेतलेली नाही. उन्हाळ्याच्या दिवसात मुबलक पाणीपुरवठा होत नसल्याचा आरोप करत शिवसेना ठाकरे गटाच्या नेतृत्वात महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कार्यालयावर नागरिकांनी बुधवारी आंदोलन करण्यात आले. यावेळी निवेदनातून मुबलक व स्वच्छ पाणी पुरवठा न झाल्यास अधिकाऱ्याच्या दलाचा घागर फोड आंदोलनाचा इशाराही यावेळी दिला. शहरातील रवी नगर, वल्लभनगर, पुरुषोत्तम नगर, आंबा विहार, पार्वती नगर परिसरातील नागरिकांना विशाल पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. या परिसराला स्वस्तिक नगर तसेच पार्वती नगर येथील पाण्याच्या टाकीतून पाणीपुरवठा होतो. मात्र मागील सहा महिन्यापासून अस्वच्छ तसेच आरोप शिवसेना ठाकरे गटाने निवेदनातून केला आहे. या संदर्भात अनेक वेळा अधिकाऱ्यांना लेखी व तोंडी स्वरूपात तक्रार करून देखील याची दखल घेण्यात आलेली नाही. तसेच मजीप्रा कार्यालयाने पाणी सोडण्याचे वेळापत्रक देखील बदलविले आहे. या सर्व अलोगोदी कारभाराला या परिसरातील महिला प्रचंड त्रस्त झाले आहे. उन्हाळ्याच्या दिवसात बादलीभरपण पाणी मिळत नाही. त्यातही एक दिवसाआड पाणीपुरवठा केला जात आहे. सध्याचे उन्हाळ्याचे दिवस असल्याने पाण्याची गरज लक्षात घेता आणि त्यांचाही संदर्भात तात्काळ उपयोजना करावी. अन्यथा युवा सेना व शिवसेना महिला आघाडी मजिप्रा अधिकारांच्या कक्षात घागर फोडोआंदोलन करेल, असा ईशारा देण्यात आला आहे. यावेळी महिला आघाडी जिल्हा प्रमुख प्रीती बंड, शिवसेना ठाकरे गटाचे महानगर प्रमुख राहुल माकोडे, यांच्या नेतृत्वात मोठ्या संख्येने स्थानिक महिला व नागरिक जीवन प्राधिकरण कार्यालयावर धडकले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here