Home सोलापूर लोकसभा सार्वत्रिक निवडणुक 2024 धरणे आंदोलन, मोर्चा, निदर्शने, उपोषण करण्यावर निर्बंध

लोकसभा सार्वत्रिक निवडणुक 2024 धरणे आंदोलन, मोर्चा, निदर्शने, उपोषण करण्यावर निर्बंध

75
0

आशाताई बच्छाव

IMG_20240319_201626.jpg

लोकसभा सार्वत्रिक निवडणुक 2024 धरणे आंदोलन, मोर्चा, निदर्शने, उपोषण करण्यावर निर्बंध

जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांचे आदेश.

युवा मराठा न्युज पेपर अँड ऑनलाईन वेब पोर्टल महादेव घोलप सोलापूर.

सोलापूर
ज्याअर्थी, मा. भारत निवडणूक आयोगाने लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठी कार्यक्रम दिनांक १६.०३.२०२४ रोजी घोषीत केला आहे. निवडणूक कार्यक्रम घोषीत केल्याच्या दिनांका पासून आदर्श आचार संहिता अंमलात आल्याने सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात लोकसभा निवडणूकीची संपूर्ण प्रक्रिया शांततेत, निर्भय व न्याय वातावरणात पार पाडण्याच्या दृष्टीकोनातुन जिल्हादंडाधिकारी/उपविभागीय दंडाधिकारी/तालुका दंडाधिकारी कार्यालय तसेच जिल्ह्यातील सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालय, शासकीय विश्रामगृह, सार्वजनिक ठिकाणे, रस्त्यावर कोणत्याही राजकीय पक्षाने, व्यक्तीने, संघटनेने निवडणूक लढविणाऱ्या उमेदवाराने किंवा त्याच्या प्रतिनिधीने किंवा त्याच्या हितचिंतकाने धरणे आंदोलन, मोर्चा, निदर्शने, उपोषण करण्यावर निबंध घालणे आवश्यक असल्याची माझी खात्री झाली आहे.आणि ज्या अर्थी सर्व संबंधीतांना नोटीस देवून त्यांचे म्हणने ऐकून घेणे सद्यस्थितीत शक्य नसल्याने एकतर्फी आदेश काढणे आवश्यक असल्याची माझी खात्री झाली आहे.असे जिल्हा अधिकारी कुमार आशिर्वाद यांनी म्हंटले आहे.

जिल्हादंडाधिकारी सोलापूर फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १४४ अन्वये
मला प्रदान करण्यात आलेल्या शक्तीचा वापर करुन असे आदेश देत आहे की, वरील परीच्छेदात नमुद केले नुसार सोलापूर (ग्रामीण), सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालय/संस्था, शासकीय विश्रामगृह, सार्वजनिक ठिकाणे, रस्त्याच्या ठिकाणी धरणे, आंदोलन, मोर्चा, निदर्शने, उपोषण करण्यावर निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत (दिनांक. ०६.०६.२०२४ पर्यंत) निबंध घालीत आहे. प्रत्येक इसमावर हे आदेश तामील करणे शक्य नसल्यामुळे हे एकतर्फी आदेश ध्वनीक्षेपकावर पोलीस विभागाने जाहीर करुन त्यास प्रसिध्दी करावी असेही आदेशात म्हटले आहे.

Previous articleहिरामण पवार यांचं निधन
Next articleदेगलूर काँग्रेसला खिंडार बळेगावकर, मिसाळे, नाईक, देशमुख आदींचा भाजप प्रवेश
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here