Home बीड रेल्वे उड्डाणपुलाखालील ट्रान्सपोर्ट रोड मंजूर होऊनही कामाच्या प्रतीक्षेत; परिसरातील नागरिकांची गैरसोय टाळणार...

रेल्वे उड्डाणपुलाखालील ट्रान्सपोर्ट रोड मंजूर होऊनही कामाच्या प्रतीक्षेत; परिसरातील नागरिकांची गैरसोय टाळणार कधी-अँड.मनोज संकाये

19
0

आशाताई बच्छाव

IMG_20240316_164554.jpg

रेल्वे उड्डाणपुलाखालील ट्रान्सपोर्ट रोड मंजूर होऊनही कामाच्या प्रतीक्षेत; परिसरातील नागरिकांची गैरसोय टाळणार कधी-अँड.मनोज संकाये

मोहन चव्हाण
ब्युरो चीफ बीड जिल्हा

बीड/परळी : 
परळी येथील रेल्वे उड्डाणपुलाखालील होत असलेले प्रदूषण आणि त्याचा नागरिकांच्या आरोग्यावर होणारा दुष्परिणाम टाळण्यासाठी लोकांकडून मागणी होत असलेल्या ट्रान्सपोर्ट रोड मंजूर होऊन महिना उलटला तरी त्याचे प्रतीक्षा काम संबंधित गुत्तेदाराकडून सुरू करण्यात आले नाही त्यामुळे रोड सुरू करण्यासाठी मुहूर्त आहे की काय तसेच रोड कधी सुरू करणार असा संतप्त सवाल सामाजिक कार्यकर्ते अँड.मनोज संकाये यांनी केला आहे. हा रोड मंजूर करण्यासाठी वेळोवेळी निवेदने देण्यात आलेली आहेत त्याचाच भाग म्हणून एक निवेदन बीड जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी दीपाताई मुधोळ/मुंडे यांची प्रत्यक्ष भेट घेऊन सादर केले आणि पत्रकार परिषद घेऊन हा मुद्दा उचलला त्या मागणीला यश आले परंतु रोडच्या कामाला प्रत्यक्षात सुरुवात झाली नाही. लोकसभेच्या आचारसंहिता पुढील आठवड्यात केव्हाही लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे त्यामुळे सरकारी कामे करता येणार नाही त्या अगोदरच रोडच्या कामाला संबंधित गुत्तेदाराला सांगून पालिका प्रशासनाने कामाला सुरुवात करावी अशी मागणी त्यांनी केली आहे. परळीतील शिवाजीनगर, इराणी गल्ली, आंबेडकर नगर, थर्मल कॉलनी या भागात राहणारे लोकांना या रोडमुळे आणि वाहनामुळे होत असलेल्या प्रदूषणामुळे त्यांच्या आरोग्यावर परिणाम होऊन आरोग्याचा दर्जा खालावला जात आहे. अनेक वर्षापासून या रोडचा विषय प्रलंबित होता त्यासाठी कोणीही प्रयत्न केले नाहीत परंतु आपण प्रयत्न करून हा रोड मंजूर करून घेतला त्यासाठी सातत्याने पाठपुरावा करावा लागला ऑफिसला चकरा माराव्या लागल्या परंतु प्रत्यक्षात गुत्ते दाराकडून कामाला सुरुवात झाली नाही त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याची न खेळता त्वरित कामाला सुरुवात करावी अशी मागणी त्यांनी केली आहे.

Previous articleपरळीत वैद्यनाथ कॉलेज कर्मचारी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी डॉ.पी. एल. कराड यांची बिनविरोध निवड
Next articleदेगलूर महाविद्यालयात महाविद्यालय विकास समितीची स्थापना.
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here