Home बीड परळीत वैद्यनाथ कॉलेज कर्मचारी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी डॉ.पी. एल. कराड यांची बिनविरोध निवड

परळीत वैद्यनाथ कॉलेज कर्मचारी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी डॉ.पी. एल. कराड यांची बिनविरोध निवड

18
0

आशाताई बच्छाव

IMG_20240316_164109.jpg

परळीत वैद्यनाथ कॉलेज कर्मचारी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी डॉ.पी. एल. कराड यांची बिनविरोध निवड

मोहन चव्हाण
ब्युरो चिफ बीड जिल्हा

बीड/परळी : परळी शहरातील जवाहर शिक्षण संस्थेच्या वैद्यनाथ कॉलेज कर्मचारी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी डॉ.पी.एल. कराड यांची कृषीमंत्री नामदार धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वाखाली व वाल्मीक अण्णा कराड यांच्या मार्गदर्शनाखाली बिनविरोध निवड प्रक्रिया करण्यात आली आहे. यासाठी आज दि १२ मार्च रोजी निवडणूक निर्णय अधिकारी श्री.एन.एन. पंडित, सहकार अधिकारी, सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था यांच्या अध्यक्षतेखाली वैद्यनाथ कॉलेज पतसंस्थेच्या कार्यालयात निवड प्रक्रिया पार पडली. यावेळी प्रा. डॉ. पी. एल. कराड यांची संचालकांच्या माध्यमातून सर्वानुमते अध्यक्ष म्हणून बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष श्रीराम मुंडे, सचिव उमेश वाघुळकर, संचालक प्रा. उत्तम कांदे, डॉ. व्ही. बी. गायकवाड, प्रा. गणेश चव्हाण, श्रीमती. सुनिता धर्माधिकारी, रमेश जाधव, नरेश साखरे कर्मचारी श्री. सूर्यकांत कदम यांची उपस्थिती होती. या निवडीबद्दल जवाहर एज्युकेशन सोसायटीच्या सर्व पदाधिकारी व संचालक मंडळांनी तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. डी. राठोड यांच्यासह महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी प्रा. डॉ. पी. एल. कराड यांचे अभिनंदन केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here