Home बीड २० मार्च रोजी मनोज जरांगे पाटील परळीत; भव्य महासंवाद बैठकीचे आयोजन

२० मार्च रोजी मनोज जरांगे पाटील परळीत; भव्य महासंवाद बैठकीचे आयोजन

25
0

आशाताई बच्छाव

IMG_20240316_163733.jpg

२० मार्च रोजी मनोज जरांगे पाटील परळीत; भव्य महासंवाद बैठकीचे आयोजन

मोहन चव्हाण
ब्युरो चिफ बीड जिल्हा

बीड/परळी  मराठा आरक्षण संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील येत्या २० मार्च रोजी परळीत येत असून ते सकल मराठा समाजाची महासंवाद बैठक घेणार आहेत. या कार्यक्रमाच्या भव्य आयोजन करण्यात येत असून या संदर्भातील सकल मराठा समाजाची नियोजन बैठक मंगळवारी परळीत संपन्न झाली. मराठा आरक्षण संघर्ष योद्धा मनोज सारखे पाटील हे सध्या राज्यभर मराठा समाजाच्या संवाद बैठका घेत आहेत. आरक्षणाबाबत दशा आणि दिशा याबद्दल ते महाराष्ट्रातील मराठा बांधवांना मार्गदर्शन करत आहेत. मराठा आरक्षणाची क्रांती भूमी असणारी परळी वैजनाथ शहरात मनोज जरांगे पाटील येत्या २० मार्च रोजी येत असून, यानिमित्ताने भव्य महासंवाद बैठक संपन्न होणार आहे. या कार्यक्रमाचे आयोजन आणि नियोजन करण्यासाठी मंगळवारी सकल मराठा समाजाची बैठक घेण्यात आली. सोज्वल मंगल कार्यालय येथे झालेल्या बैठकीस परळी तालुक्यातील सकल मराठा समाजातील बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. दिनांक २० मार्च रोजी परळी वैजनाथ येथे होत असलेल्या कार्यक्रमास बीड, परभणी आणि लातूर जिल्ह्यातील मराठा बांधव हजारोच्या संख्येने येणार आहेत. यासाठी कार्यक्रमाचे भव्य आणि शिस्तबद्ध नियोजन करण्यात येणार असल्याची माहिती सकल मराठा समाजाच्या बैठकीत देण्यात आली.

Previous articleदत्तनगर गावासाठी शेती महामंडळची सुमारे १५ एकर जागा गावठाणासाठी मंजूर .
Next articleपरळीत वैद्यनाथ कॉलेज कर्मचारी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी डॉ.पी. एल. कराड यांची बिनविरोध निवड
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here