Home Breaking News *सकल मराठा समाजाच्या वतीने हातकणंगले येथे महा मोर्चा*

*सकल मराठा समाजाच्या वतीने हातकणंगले येथे महा मोर्चा*

116
0

*सकल मराठा समाजाच्या वतीने हातकणंगले येथे महा मोर्चा*

*कोल्हापूर (मोहन शिंदे ब्युरोचिफ युवा मराठा न्युज)*

कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले येथे सकल मराठा समाजाच्या वतीने सांगली कोल्हापूर हायवेवरती ठिय्या आंदोलन व महामोर्चाचे नियोजन तालुक्यातील व परिसरातील गावातील मराठा समाजाच्या वतिने करण्यात आले.
सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्यामुळे अन्याय झाल्याची भावना समाजात आहे. ही स्थगिती तत्काळ उठवण्यासाठी राज्य सरकारने प्रयत्न करावेत, एकही मराठा तरुण शिक्षणाशिवाय किंवा नोकरीशिवाय राहता कामा नये, अशी मागणी या वेळी करण्यात आली.
स्थगिती उठेपर्यंत राज्य सरकारने पोलिसांची व अन्य नोकरभरती करू नये, अशी नोकरभरती आम्ही होऊ देणार नाही. आम्ही आज शांततेत आंदोलन केले आहे, मात्र मराठा समाजाच्या भावनांचा उद्रेक झाल्यास त्यास केवळ सरकारच जबाबदार असेल, असा इशारा मराठा क्रांती मोर्चाचे तालुका अध्यक्ष यांनी दिला.
यावेळी सकल मराठा समाज तालुका अध्यक्ष रवींद्र पाटील, नगरसेवक राजु इंगवले (सरकार) ,सुभाष चव्हाण, भाऊसाहेब फ़ासके, विजय निंबाळकर, कृष्णा चव्हाण, उमेश सूर्यवंशी ,मनोज इंगवले, विजय जाधव, अँड.विजयसिंह निंबाळकर (सरकार), पंडित निंबाळकर, दीपक कुन्नुरे, सागर मोरे , महादेव मुळीक तसेच इतर सकल मराठा समाजाचे मान्यवर व कार्यकर्ते मोठ्या संखेने उपस्थित होते.

Previous article*मराठा आरक्षणाच्या निषेधार्त* *सोलापूर जिल्हा बंद व आम.राजेंद्र राऊत यांच्या घरासमोर असुड आंदोलन*
Next article
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here