Home गडचिरोली विजयनगर येथील बंगाली बांधवांच्या जमिनीवरील अतिक्रमणाची कारवाई तात्काळ थांबवावी आमदार डॉक्टर देवरावजी...

विजयनगर येथील बंगाली बांधवांच्या जमिनीवरील अतिक्रमणाची कारवाई तात्काळ थांबवावी आमदार डॉक्टर देवरावजी होळी

59
0

राजेंद्र पाटील राऊत

IMG-20220528-WA0016.jpg

विजयनगर येथील बंगाली बांधवांच्या जमिनीवरील अतिक्रमणाची कारवाई तात्काळ थांबवावी

आमदार डॉक्टर देवरावजी होळी

शेतजमिनीचे अतिक्रमण हटविल्यास हजारो बंगाली बांधवांच्या परिवारावर उपासमारीची पाळी येणार

बंगाली बांधवांचे शेतजमिनीचे अतिक्रमण हटविणे हे अमानवीय कृत्य असल्याचा गंभीर आरोप

अन्यायाचा विरोध करताना अनुचित काही घडल्यास महाविकास आघाडीचे सरकार जबाबदार

बंगाली बांधवांनी शांतता पाळावी ,लोकशाही व शांततेच्या मार्गाने आंदोलन करावे

अन्यायकारी ,अत्याचारी महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात प्रत्येक बंगाली गावात आंदोलन करण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन

गडचिरोली,(सुरज गुंडमवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)

मागील २५ वर्षां हून अधिक कालावधी पासून शेतजमीन करणाऱ्या बंगाली बांधवांची शेती वनविभागाच्या माध्यमातून अतिक्रमण म्हणून काढण्याचा प्रयत्न महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून होत असून मागील शेती कसणाऱ्या बंगाली बांधवांचे अतिक्रमण हटविणे मानवी हक्कांचे उल्लंघन असून अमानवीय कृत्य असल्याचा गंभीर आरोप करीत विजयनगर तालुका मुलचेरा येथील बंगाली बांधवांच्या जमिनीवरील अतिक्रमणाची कारवाई तात्काळ थांबविण्यात यावी अशी मागणी आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी शासनाला केली आहे.

राज्यात सत्तेत आलेल्या महाविकास आघाडी सरकारने मागील २ वर्षांपासून ऊठसूट बंगाली बांधवांचे अतिक्रमण काढण्याचा सपाटा सुरू केला आहे .याबाबत जिल्हाधिकाऱ्यांशी झालेल्या बैठकीनंतर जिल्हाधिकाऱ्यांनी सदर अतिक्रमण थांबविण्यात यावे असे निर्देश वन अधिकाऱ्यांना दिलेले असताना सुद्धा स्थानिक उपवनसंरक्षक व वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी बंगाली बांधवांना नाहक त्रास देण्यासाठी अतिक्रमण हटविण्याची मोहीम सुरू केली आहे. अशा अधिकाऱ्यांवर कारवाई होण्याची आवश्यकता असल्याचेही त्यांनी म्हटले आहे

सरकारने बंगाली बांधवांच्या सहनशीलतेचा अंत पाहू नये बंगाली बांधवांकडून काही अनुचित प्रकार झाल्यास त्यास महाविकास आघाडी सरकार जबाबदार राहील असे प्रतिपादन आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी केले आहे. अन्यायकारी ,अत्याचारी महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात प्रत्येक बंगाली गावात आंदोलन करण्याची आवश्यकता असून बंगाली बांधवांनी लोकशाही व शांततेच्या मार्गाने आंदोलन करावे असे आवाहन त्यांनी केले आहे

Previous articleगडचिरोली जिल्ह्यातील ओबीसी आरक्षणाच्या स्थितीबाबत ओबीसी समर्पित आयोगाला निवेदन खा.अशोकजी नेते
Next articleअमृत सरोवर’ पुस्तक प्रकाशन सोहळा शेतकऱ्याने ‘उर्जादाता’ व्हावे-केंद्रीय मंत्री नितीन गडकरी
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here