Home गडचिरोली भाजपा ही कार्यकर्त्यांची पार्टी आमदार डॉ देवरावजी होळी

भाजपा ही कार्यकर्त्यांची पार्टी आमदार डॉ देवरावजी होळी

57
0

आशाताई बच्छाव

IMG-20220901-WA0044.jpg

भाजपा ही कार्यकर्त्यांची पार्टी

आमदार डॉ देवरावजी होळी                                   गडचिरोली,(सुरज गुंडमवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)

गडचिरोली भाजपा तालुका पदाधिकारी बैठकीचे प्रेस क्लबच्या सभागृहात आयोजन

आमदार डॉ. देवरावजी होळी यांनी घेतला गडचिरोली तालुक्याचा बूथ सशक्तीकरणाचा आढावा

केंद्र सरकारच्या जन कल्याणकारी योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी कार्यकर्त्यांनी काम करावे

जगातील सर्वात मोठी असणारी भारतीय जनता पार्टी ही सर्वसामान्य कार्यकर्त्यांची पार्टी असून या पार्टीचा मालक हा सर्वसामान्य कार्यकर्ता असल्याचे प्रतिपादन गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉ देवरावजी होळी यांनी प्रेस क्लबच्या सभागृहात आयोजित गडचिरोली भाजपा तालुका पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या बैठकीच्या प्रसंगी केले.

यावेळी जिल्हा महामंत्री रवींद्रजी ओल्लारवार , जिल्हा महामंत्री प्रमोदजी पिपरे, जिल्हा उपाध्यक्ष प्रणयजी खुणे ,डॉक्टर भारत खट्टी, तालुकाध्यक्ष रामरतन गोहणे, तालुका संपर्क प्रमुख विलासजी भांडेकर , माजी पंचायत समिती उप विलासजी दशमुखे, तालुका महामंत्री हेमंत बुरकुटे, लोमेश कोलते, राजू खंगार मंचावर उपस्थित होते.

यावेळी बोलताना आमदार डॉक्टर देवरावजी होळी म्हणाले की, भारतीय जनता पार्टी ही कार्यकर्त्यांची पार्टी असून लहान लहान कार्यकर्ता पक्षाच्या सर्वोच्च पदापर्यंत भारतीय जनता पार्टीने पोहोचलेला आहे यामध्ये कोणत्याही परिवाराची पार्टी नसून सर्वसामान्य कार्यकर्त्याची पार्टी आहे त्यामुळे भाजपाला पुढे नेण्यासाठी प्रत्येक कार्यकर्त्यांनी काम करण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी यावेळी म्हटले.

पदाधिकाऱ्यांनी आपल्या बुथाच्या १+३० समितीची रचना पूर्ण करावी. बूथ सशक्तिकरणाची उर्वरीत राहिलेली कामे तातडीने पुर्ण करावी. केंद्र सरकारच्या जनकल्याणकारी योजनांचा लाभ सर्वसामान्य लोकांना लाभ मिळवून देण्यासाठी पुढाकार घेण्याची आवश्यकता असून त्यांना लाभ मिळवून देण्यासाठी काम करावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here