Home गडचिरोली पुरामुळे शेतातील पिंक नष्ट झाल्याने शेतकऱ्यांने केली आत्महत्या। मुडझा गावातील सलग दुसरी...

पुरामुळे शेतातील पिंक नष्ट झाल्याने शेतकऱ्यांने केली आत्महत्या। मुडझा गावातील सलग दुसरी घटना

143

आशाताई बच्छाव

IMG-20220901-WA0043.jpg

पुरामुळे शेतातील पिंक नष्ट झाल्याने शेतकऱ्यांने केली आत्महत्या।
मुडझा गावातील सलग दुसरी घटना

गडचिरोली,(सुरज गुंडमवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्): वैनगंगेला आलेल्या पुरामुळे शेतातील पिंक नष्ट झाले.त्यामुळे नापिकिच्या चिंतेत सापडलेल्या गडचिरोली तालुक्यातील मुडझा येथील एका शेतकऱ्यांने घरालगत असलेल्या अंगनातील आंब्याच्या झाडाला गळफास घेऊन आपली जिवनयाञा संपविली.सदर धक्कादायक घटना 1 सप्टेंबर रोजी सकाळच्या सुमारास घडली.शेतकरी आत्महत्येची मुडझा गावातील हि दुसरी घटना आहे.
महेंद्र सदाशिव आवडे (35) रा. मुडझा असे मृतकाचे नाव आहे घटनेची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठले.महेंद्र आवडे यांनी कोणत्या कारणामुळे आत्महत्या केली याबाबत अधिकृत माहीत प्राप्त झाली नसली तरी त्याने यावर्षी शेतातील पिंक हातुन गेल्याने नैराश्यातुन आत्महत्या केल्याचे बोलले जात आहे. पुरर्वि मुडझा गावातील चौधरी नामक शेतकऱ्यांने आत्महत्या केल्याची घटना घडली. त्यानंतर पुन्हा पद्रा दिवसातच आवडे या शेतकऱ्यांने टोकाचे पाऊल उचलले. प्रकरनाचा अधिक तपास पोलीस निरीक्षक अंरविद कतलाम यांच्या मार्गदर्शनात पोलिस कर्मचारी करीत आहेत.

Previous articleभाजपा ही कार्यकर्त्यांची पार्टी आमदार डॉ देवरावजी होळी
Next articleभाजपाला विजयी करण्यासाठी कार्यकर्त्यांनी निवडणुकीच्या कामाला लागावे
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.