Home गडचिरोली भाजपाला विजयी करण्यासाठी कार्यकर्त्यांनी निवडणुकीच्या कामाला लागावे

भाजपाला विजयी करण्यासाठी कार्यकर्त्यांनी निवडणुकीच्या कामाला लागावे

54
0

आशाताई बच्छाव

IMG-20220901-WA0035.jpg

भाजपाला विजयी करण्यासाठी कार्यकर्त्यांनी निवडणुकीच्या कामाला लागावे

चामोर्शी तालुक्याच्या भाजपा कार्यकारिणीची बैठक                                                               गडचिरोली,(सुरज गुंडमवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)

बूथ सशक्तीकरणासह केन्द्र व राज्य सरकारच्या योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी पदाधिकाऱ्यांनी काम करावे

जिल्हा परिषदेच्या व पंचायत समितीच्या निवडणुका जिंकण्यासाठी भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी कामाला लागावे असे आवाहन गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉ देवरावजी होळी यांनी भाजपा पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत केले.

यावेळी मंचावर भाजपा जिल्हा महामंत्री रविंद्रजी ओल्लारवार, जिल्हा महामंत्री प्रमोदजी पिपरे, बंगाली आघाडीचे जिल्हाध्यक्ष सुरेशजी शहा, तालुका अध्यक्ष दिलीपजी चलाख, ओबीसी आघाडीचे जिल्हा महामंत्री तथा नगरसेवक आशीषजी पीपरे, तालुका महामंत्री विनोद गौरकार, साईनाथजी बुरांडे, सरपंच भास्करराव बुरे प्रामुख्यानं उपस्थित होते.

आता लवकरच पंचायत समिती व जिल्हा परिषदेच्या निवडणुका लागणार असून त्यासाठी प्रत्येक भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी तयार असणे आवश्यक आहे या निवडणुकीच्या पूर्वी केंद्र व राज्य सरकारच्या जनकल्याणकारी योजनांची माहिती स्थानिकांना देऊन त्याचा त्यांना कसा लाभ मिळवून देता येईल यासाठी कार्यकर्त्यांनी पुढाकार घेण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन केले.

त्याचबरोबर बूथ सशक्तीकरण अभियानांतर्गत ज्या बुथांची कामे अजुनपर्यंत झालेली नाही त्या बूथांची कामे तातडीने पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी या प्रसंगी म्हटले.

Previous articleपुरामुळे शेतातील पिंक नष्ट झाल्याने शेतकऱ्यांने केली आत्महत्या। मुडझा गावातील सलग दुसरी घटना
Next articleमहागाई विरोधात राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे आंदोलन
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here