Home गडचिरोली महागाई विरोधात राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे आंदोलन

महागाई विरोधात राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे आंदोलन

71
0

आशाताई बच्छाव

IMG-20220901-WA0031.jpg

महागाई विरोधात राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे आंदोलन

गडचिरोली,(सुरज गुंडमवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)- येथील इंदीरा गांधी चौक येथे राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने महागाई विरोधी ‘ ५० खोके महागाई एकदम ओके’ आंदोलन करण्यात आले. आंदोलनाचे नेतृत्व युवक अध्यक्ष लिलाधर भरडकर यांनी केले.
आताच्या घडीला केंद्र सरकारने गहु, तांदुळ, दाळ व अन्य कळधान्यावर सरकारने जीएसटी लावण्यात आल्याने त्याचा शेतकऱ्यांना नुकसान असून व्यापारी फायदा घेत आहेत. सर्वसामान्य जनतेला मात्र आर्थिक भुर्दंड बसत आहे. केंद्रसरकार राज्याचे सरकार बदल करण्यासाठी आमदारांना आर्थिक साहाय्य करुन आमदार फोडा फोडीच राजकारण करते, परंतू सामान्य जनतेचे प्रश्न किंवा महागाई बदल बोलत नाही आहे. सामान्य कुटुंबातील व्यक्तींना आज गॅस सीलेंडर चे ५० रु दरवाढ झाल्याने आजच्या घडीला १११० रु चा गॅस सीलेंडर ‍मिळत असल्याने पुन्हा चुलीवर सामान्य कुटुंबाचा गाडा चालवत आहे. त्याचा विरोध म्हणून आज निषेध आंदोलन करण्यात आले. यावेळी जिल्हाध्यक्ष रविंद्र वासेकर, प्रदेश युवक सरचिटणीस, प्रा. रिंकू पापडकर, युवक जिल्हा उपाध्यक्ष प्रसाद पवार, शहर अध्यक्ष अमोल कुळमेथे, रणजीत रामटेके, योगेश नांदगाये, कपील बागडे, संजय कोचे, इंद्रपाल गेडाम, फईम काजी, आकाश पगाडे, तालुकाध्यक्ष श्रीधर येरावार, तालुका अध्यक्ष विवेक बाबनवाडे, सदीप तुंकलवार, रुपेश चुधरी, शिवराम सोदुरवार, गीरीधर सोदुरवार, महेश खोब्रागडे, नेताजी कोडाप, नामदेव मोहुर्ले, आशीक बर्लावार, गजानन तुंकलवार, आकाश खोब्रागडे, रविंद्र नेचलवार, अंकुश मामीडवार, अरुण नैताम, महेश टीपले, गुलाम शेख, धनराज मेश्राम आदी उपस्थित होते.

Previous articleभाजपाला विजयी करण्यासाठी कार्यकर्त्यांनी निवडणुकीच्या कामाला लागावे
Next articleमौजा गौरीपूर येथील फुटबाल प्रतियोगीतेच्या बक्षीस वितरण कार्यक्रमाला डॉक्टर देवरावजी होळी यांची सदिच्छा भेट
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here