Home गडचिरोली मौजा गौरीपूर येथील फुटबाल प्रतियोगीतेच्या बक्षीस वितरण कार्यक्रमाला डॉक्टर देवरावजी होळी यांची...

मौजा गौरीपूर येथील फुटबाल प्रतियोगीतेच्या बक्षीस वितरण कार्यक्रमाला डॉक्टर देवरावजी होळी यांची सदिच्छा भेट

122

आशाताई बच्छाव

IMG-20220901-WA0023.jpg

मौजा गौरीपूर येथील फुटबाल प्रतियोगीतेच्या बक्षीस वितरण कार्यक्रमाला डॉक्टर देवरावजी होळी यांची सदिच्छा भेट

विजेत्यांचे अभिनंदन करीत आयोजकांना कार्यक्रमासाठी दिल्यात शुभेच्छा                           गडचिरोली,(सुरज गुंडमवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)

अती व्यस्त कार्यक्रमांमुळे बक्षिस समारंभाला पूर्ण वेळ राहणे शक्य नसल्याने सदिच्छा भेट

खासदार अशोकजी नेते यांच्या हस्ते होणार बक्षिस वितरण कार्यक्रम

मौजा गौरीपुर तालुका चामोर्शी येथिल फुटबॉल प्रतियोगिताला गडचिरोली विधानसभाचे आमदार डॉ देवरावजी होळी यांनी सदिच्छा भेट दिली यावेळी त्यांनी विजेत्या स्पर्धकांचे अभिनंदन करीत आयोजकांना कार्यक्रमासाठी शुभेच्छा दिल्यात

यावेळी जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या सौ शिल्पा राय,भाजप बंगाली आघाडी जिल्हाध्यक्ष सुरेशजी शहा, फुटबॉल मंडळाचे पदाधिकारी, तालुका उपाध्यक्ष जयरामजी चलाख प्रामुख्यानं उपस्थित होते.

आज गडचिरोली तालुका व चामोर्शी तालुक्याची महत्त्वाची बैठक असल्याने दोन्ही बैठकांना उपस्थित राहणे आवश्यक आहे. त्यानंतर गणपती बाप्पांच्या महाप्रसादाचे कार्यक्रम असल्याने या अती व्यस्त कार्यक्रमांमुळे मला बक्षिस वितरण समारंभाला पूर्ण वेळ राहणे शक्य नाही. त्याबद्दल त्यांनी दिलगिरी व्यक्त केली. सदिच्छा भेट घेऊन आयोजकांना कार्यक्रमासाठी शुभेच्छा दिल्यात.

आपण या समारंभाला उपस्थित राहणार नसलो तरी मा. खासदार अशोकजी नेते कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत असेही ते म्हणाले