Home नाशिक मांगीतुंगी भिलवाड येथे क्रांतीदिवस आदिवासी दिन उत्साहात साजरा

मांगीतुंगी भिलवाड येथे क्रांतीदिवस आदिवासी दिन उत्साहात साजरा

156

आशाताई बच्छाव

IMG-20220811-WA0000.jpg

ताहराबाद,(प्रवीण पवार प्रतिनिधी युवा मराठा न्युज नेटवर्क)                                                          भिलवाड ( मांगीतुंगी ) बागलाण येथे  ९ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिन उत्साहात साजरा  गांवचे जेष्ठ आदिवासी नेते तथा मा. सरपंच रामभाऊ पवार व आदिवासी सोसायटीचे चेअरमन मा. रघुनाथ देशमुख यांचे हस्ते महादंडनायक वीर एकलव्य व क्रांतीवीर बीरसा मुंडा यांच्या फोटो प्रतीमांना पुष्पहार अर्पण व दीप ,धुप पुजन करून आदिवासी जनतेत जन जाग्रुती व्हावी म्हणून गांवातून प्रबोधन फेरी काढण्यात आली सदर कार्यक्रम प्रसंगी गांवचे पोलिस पाटील श्री. रविंद्र कुंवर , विद्यमान सरपंच श्री. बाळासाहेब पवार , श्री. ऊखा कुंवर , आत्माराम पवार. श्रीमती सखुबाई ठाकरे , माजी सरपंच श्रीमती बायजा पवार , ताईबाई पवार कुंवर , अंगणवाडी कार्यकर्ती श्रीमती रंजना म्हसदे ,मदतणीस श्रीमती दुर्गा श्रीवास्तव , आदिंनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला कार्यक्रम यशस्वीतेसाठी नंदकुमार पवार व तरुणांनी विशेष परिश्रम घेतले

Previous articleचांदवडच्या सुतारखेडेत स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करण्याची जय्यत तयारी सुरु
Next articleसहा वेळा निवडून येणारे डॉ.विजयकुमार गावीत झाले चौथ्यांदा मंत्री..   
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.