Home अमरावती विदर्भात पानवठ्यावर’जागते रहो’व्याघ्र प्रकल्पावर तस्करांची नजर; राष्ट्रीय व्याघ्र प्राधिकार्‍याकडून सूचना.

विदर्भात पानवठ्यावर’जागते रहो’व्याघ्र प्रकल्पावर तस्करांची नजर; राष्ट्रीय व्याघ्र प्राधिकार्‍याकडून सूचना.

38
0

आशाताई बच्छाव

IMG_20240309_195541.jpg

विदर्भात पानवठ्यावर’जागते रहो’व्याघ्र प्रकल्पावर तस्करांची नजर; राष्ट्रीय व्याघ्र प्राधिकार्‍याकडून सूचना.
———-
दैनिक युवा मराठा
पी एन देशमुख.
अमरावती जिल्हा विभागीय संपादक.
अमरावती.
उन्हाळ्यात वाघांना र्तुष्णा भागविण्यासाठी जंगलात भटकंती करावी लागते. नेमकी हीच बाब हेरून व्याघ्र तस्कर हे वाघाच्या शिकारीसाठी सज्ज होत विशेषतः एप्रिल मे महिन्यात व्याघ्र प्रकल्पात पानवठ्यावर वाघाच्या वीषप्रयोगाची भीती असून, विदर्भातील वन कर्मचाऱ्यांना’जागते रहो’च्या सूचना राष्ट्रीय व्याघ्रा प्राधिकरणाकडून देण्यात आले आहे. अनुषंगाने व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक’अलर्ट’झाले आहे. बॅकग्राऊंड तस्कराकडून वाघांच्या शिकारीसाठी जंगलात लोखंडी ट्रॅप लावणे, पान वठ्यावर विष प्रयोग करण्याचा घटना यापूर्वी निदर्शनात आले आहेत. तस्कराची ही मोहीम फत्ते झाल्यास वाघाच्या विविध अवयवाची आंतरराष्ट्रीय स्तरावर विक्री केली जाते. दिल्ली नेपाळ मार्ग चीन पर्यंत व्याघ्र तस्करीचे कनेक्शन असल्याचे दिल्ली येथील वन जीव नियंत्रण बिरो ने यापूर्वी उघडकीस आणले आहे. विदर्भातील वाघावर मध्य प्रदेशातील बहेलिया, तर पंजाबच्या बाहेर टोळ्यांचे लक्ष आहे. त्यामुळे विदर्भातील मेळघाट, ताडोबा-अंधारी, पेंच, नवेगाव-नागझिरा, बोर, टिपेश्वर या अभयारण्य नजिकच्या गावामध्ये संसद अथवा परप्रांतीय व्यक्ती दिसल्यास स्थानिक पोलिसांना तात्काळ माहिती देण्याचे सूचना व्याघ्र प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांना मिळाले की विश्वासनीय माहिती आहे. गतवर्षी २७जुन२०२४ रोजी गडचिरोली नजीकच्या आंबे शिवणी येथे व्याग्र शिकारी च्या साहित्यासह संकेत ६, पुरुष५ महिला, ५ पाच लहान मुलांना पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. हे विशेष. त्या पानवट्यावर टँकरने पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेण्यात आला. व्याघ्र प्रकल्पात नैसर्गिक, कुत्रिम पानवठ्यात पाणी समस्या उद्भवल्यास प्रसंगी टँकरने पाणीपुरवठा करावा, असे निर्देश वन्यजीव विभागाच्या वरिष्ठांनी दिले आहे. सोलर नसलेल्या पानवठ्यावर वाघाची तहान भागविण्यासाठी स्वातंत्र्य नियोजन करण्यात येणार आहे. पाण्याअभावी वन्य प्राण्यांचे मृत्यू होता कामा नये, अशी गाईडलाईन आहे. पान वठ्याच्या नियमित तपासणीसाठी लीटमसपेपरचा वापर अनिवार्य केला आहे. तर नैसर्गिक कृत्रिम पाणी ओठावर वन कर्मचारी तैनात करण्याची सूचना आहे. पानवठ्याची पेपरने नियमित तपासणी केली जाते. मात्र उन्हाळ्यात याविषयी काळजी घेतली जाते. ज्या ठिकाणी सोलर वीज उपलब्ध नाही, अशा पाणवठ्या मध्ये टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे.पाणवठ्याची देखभाल, तपासणीसाठी बीटनिहाय वन कर्मचाऱ्यावर जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे. असे आमचे प्रतिनिधी तथा विशेष प्रतिनिधी यांना मनोज कुमार खैरनार उपवन रक्षक मेळघाट व्याघ्र प्रकल्प क्राईम सेल यांनी माहिती दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here