Home मुंबई ग्राहक सेवा संस्था (Consumer Awareness Committee) च्या पदाधिकाऱ्यांनी जागतिक महिला दिनानिमित्त सायन...

ग्राहक सेवा संस्था (Consumer Awareness Committee) च्या पदाधिकाऱ्यांनी जागतिक महिला दिनानिमित्त सायन हॉस्पिटल मध्ये रक्तदान करून ओळखपत्र वितरण केले.

123

आशाताई बच्छाव

IMG_20240309_195259.jpg

ग्राहक सेवा संस्था (Consumer Awareness Committee) च्या पदाधिकाऱ्यांनी जागतिक महिला दिनानिमित्त सायन हॉस्पिटल मध्ये रक्तदान करून ओळखपत्र वितरण केले.
सविता तावरे-मुंबई स्पेशल रीपोर्टर
संस्थापक अध्यक्ष श्री गितेंद्र मिर्लेकर सर यांच्या निर्देशानुसार, आज 8 मार्च रोजी सकाळी महिला दिन साजरा करण्यासाठी आपल्या संघटनेच्या महिलांना आमंत्रित केले होते. जीवनदाता सामाजिक संस्थेच्या मार्फत केवळ महिलांसाठी रक्तदान शिबिराचे आयोजन केले महिलांसाठीच विशेष प्लॅटफॉर्म उपलब्ध केला होता. सर्व क्षेत्रात महिला आघाडीवर आहेत पण रक्तदानात महिला कुठेच दिसत नाही नेहमीच यांचे हिमोग्लोबिन कमी असे महिलांना हिणवले जाते . याला जशास तसे उत्तर म्हणून या रक्तदान शिबिरात केवळ महिलाच रक्तदान करतील असे महिला दिनाच्या निमित्ताने आव्हान केले होते. या कार्यक्रमाला मुंबई महिला अध्यक्षा सविता तावरे, मुंबई सचिव सुरेश रेवणकर, मुंबई उपाध्यक्षा वैशाली कांबळे आणि घाटकोपर उपाध्यक्षा संगीता मांडे, कल्याण तालुका अध्यक्ष उज्वला पवार यांनी संघटनेच्या वतीने उपस्थिती दर्शविली. या कार्यक्रमात जागतिक महिला दिना वर वैशालीताई कांबळे यांनी सुंदर गाणे गायले आणि संघटनेची माहिती देऊन महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या. सविता तावरे मॅडम यांना ही रक्तदान करण्याची इच्छा पण यांचे हिमोग्लोबिन कमी असल्यामुळे त्या रक्तदान करू शकल्या नाहीत. वैशालीताईंना देखील थायरॉईड चा प्रॉब्लेम असल्यामुळे त्यांचे रक्तदान होऊ शकले नाही परंतु संगीताताई मांडे आणि उज्वला पवार या दोघींनी रक्तदान करण्याचे पवित्र कार्य आज पार पाडले. त्यानंतर आम्हा सर्वांना महिला दिनाच्या निमित्ताने भेट वस्तू देऊन आणि ढाल तलवार फेटा आणि मराठमोळी नथ घालून सर्वांना गौरविण्यात आले. काही मनोरंजक कार्यक्रमात देखील आपल्या संघटनेच्या महिलांनी भाग घेतला आणि महिला दिनाचा पुरेपूर आनंद घेतला. या पूर्ण कार्यक्रमात सुरेश रेवणकर शतकवीर रक्तदाता आहेत त्यांनी सर्वांना या कामात पूर्ण मदत केली. आणि त्यांच्यामुळेच महिलांना सायन हॉस्पिटलमध्ये या कार्यक्रमाचा आनंद घेता आला त्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार.

Previous articleसोनईत महिला दिन उत्साहात साजरा
Next articleविदर्भात पानवठ्यावर’जागते रहो’व्याघ्र प्रकल्पावर तस्करांची नजर; राष्ट्रीय व्याघ्र प्राधिकार्‍याकडून सूचना.
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.