Home भंडारा मानव सेवा मंडळा कडून गरजूंना ब्लँकेट वाटप व ज्येष्ठांचा सत्कार

मानव सेवा मंडळा कडून गरजूंना ब्लँकेट वाटप व ज्येष्ठांचा सत्कार

29
0

आशाताई बच्छाव

IMG_20231225_064336.jpg

मानव सेवा मंडळा कडून गरजूंना ब्लँकेट वाटप व ज्येष्ठांचा सत्कार

कार्यक्रमास ग्रीनफ्रेंड्स नेचर क्लब व गुरुकुल आयटीआयचे सहकार्य

संजीव भांबोरे
भंडारा (जिल्हा प्रतिनिधी) ग्रीनफ्रेंड्स नेचर क्लबने लाखनी बसस्थानकावर तयार केलेल्या नेचर पार्कवर सकाळी फिरायला येणाऱ्या ज्येष्ठ व सेवानिवृत्त मंडळींनी दीड वर्षांपूर्वी मानव सेवा मंडळाची स्थापना ग्रीनफ्रेंड्स नेचर क्लब तसेच गुरुकुल आयटीआयच्या सहकार्याने करण्यात आली.या मानव सेवा मंडळामार्फत अनेक सेवाभावी उपक्रम घेण्यात आले.यात चार ठिकाणी माणुसकीची भिंत,गोरगरिबांना कपडे वाटप,केरकचरा स्वच्छता अभियान,भिकारी -निनावी बेदखल निराधार लोकांची स्वच्छता,विविध मनोरंजन करणाऱ्या सहली,मनोरंजन कार्यक्रम, ज्येष्ठांचा वाढदिवस,दररोज संगीत योगा,संगीतमय व्यायाम व प्रार्थना असे अनेक उपक्रम आखले गेले.
याच उपक्रमातुन नुकतेच वाढलेल्या थंडीने गोरगरिबांना ब्लॅंकेटचे वाटप लाखनीतील संजयनगर व सिपेवाडा शिवमंदिर परिसरात करण्यात आले.दोन्ही ठिकाणी मिळून एकूण 72 ब्लॅंकेटचे वाटप मानव सेवा मंडळाचे पदाधिकारी शिवलाल निखाडे ,सेवानिवृत्त महसूल निरीक्षक गोपाल बोरकर ,चंद्रपूर जिल्ह्यातील सावली मुल येथे कार्यरत असलेले पोलीस निरीक्षक आशिष गोपाल बोरकर ,ऍड. शफी लद्धानी,भीमराव गभने,भैय्यालाल बावनकुळे,अशोक वैद्य इत्यादींच्या हस्ते करण्यात आले.ब्लँकेटची उपलब्धता इन्स्पेक्टर आशिष बोरकर यांनी स्वखर्चातुन केल्याने मानव सेवा मंडळ, ग्रीनफ्रेंड्स नेचर क्लब व गुरुकुल आयटीआय तर्फे त्यांचे विशेष आभार मानण्यात आले.
गुरुकुल आयटीआय येथे मानव सेवा मंडळातर्फे 75 वर्षे पूर्ण केलेल्या सदस्यांचा शाल, श्रीफळ व स्मरणचषक देऊन सत्कार करण्यात आला.यात ज्येष्ठ नागरिक मारोतराव कावळे,डॉ. पंढरीनाथ इलमकर,भैय्यालाल बावनकुळे,भीमराव कांबळे या सत्कारमूर्तीचा सत्कार मंडळाचे ज्येष्ठ पदाधिकारी ऍड. शफी लद्धानी,रमेश गभने,भिमराव गभने यांचे हस्ते सत्कार करण्यात आला.याप्रसंगी प्रास्ताविक शिवलाल निखाडे तर मनोगत सुभाष बावनकुळे यांनी तसेच सर्वच प्रमुख अतिथी व सत्कारमूर्तींनी आपल्या भावना व्यक्त करून आयोजकांना धन्यवाद दिले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन गुरुकुल आयटीआयचे प्राचार्य खुशालचंद्र मेशराम यांनी केले.कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता मानव सेवा मंडळाचे संयोजक शिवलाल निखाडे,दिलीप निर्वाण यांनी तसेच ग्रीनफ्रेंड्स नेचर क्लबचे अशोक वैद्य ,मारोतराव कावळे, अशोक नंदेश्वर, मंगल खांडेकर, प्रा.अशोक गायधने, गुरुकुल आयटीआय प्राचार्य खुशाल मेशराम,विद्यमान जाधव,पुरुषोत्तम मटाले, डॉ दिलीप अंबादे,अशोक हलमारे,ऋषी वंजारी, योगराज वंजारी,रामकृष्ण गिर्हेपुंजे,ताराचंद गिर्हेपुंजे, अशोक धरमसारे,टोलीराम सार्वे, संदीप मेश्राम,सुनील खेडीकर,वसंता मेश्राम,माणिक निखाडे, नरेश इलमकर, मधुकर गायधनी,दुलीचंद बोरकर,यांनी कार्यक्रम आयोजनासाठी परिश्रम घेतले.

Previous articleजिल्ह्यातील नागरिकांनी संत गाडगे महाराजांचे आदर्श डोळ्यासमोर ठेवावे- प्रदिप काटेखाये
Next articleवंचित बहुजन आघाडी तर्फे पाच गावात संविधान सन्मान रॅलीला उत्तम प्रतिसाद
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here