Home बुलढाणा युवा मराठा न्यूज च्या बातमीची दखल, फर्जी कोतवालची तहसीलदार यांनी घेतली परेड….

युवा मराठा न्यूज च्या बातमीची दखल, फर्जी कोतवालची तहसीलदार यांनी घेतली परेड….

66
0

राजेंद्र पाटील राऊत

IMG-20220514-WA0030.jpg

युवा मराठा न्यूज च्या बातमीची दखल, फर्जी कोतवालची तहसीलदार यांनी घेतली परेड….

ज्ञानेश्वर पाटील दांदळे
तालुका विशेष प्रतिनिधी

संग्रामपुर :- संग्रामपूर तहसीलदारांच्या आदेशानंतर सुद्धा फर्जी कोतवाल यांची मनमानी सुरूच..
संग्रामपूर तालुक्यातील फर्जी कोतवाल बाबतची बातमी प्रकासीत होताच कुंभकर्णी झोपेत असलेल्या महसूल विभागाला आली जाग . आणि तात्काळ त्याचदिवशी वानखेड भाग दोन येथील (फर्जी कोतवाल) चा मुलगा मूळ कोतवाल असलेला योगेश रावणकार यास पुण्यावरून बोलावण्यात आले. आणि दुसर्याच दिवशी दिनांक 9 मे रोजी दुपारी तीन वाजता दरम्यान तहसीलदार वरणगावकर यांनी संग्रामपूर तालुक्यातील सर्व कोतवालांची मिटिंग तहसील कार्यालयात घेऊन सर्व कोतवाल यांची सखोल माहिती घेऊन सर्व कोतवाल यांना आपापल्या हल्क्यावर स्वतः हजर राहावे अशी ताकीद देण्यात आली. आणि वानखेड भाग दोनचे कोतवाल योगेश रावणकार यांचे वडील “फर्जी कोतवाल” गणेश रावणकार यांची चांगलीच तहसीलदार साहेबांनी परेट घेतल्याची चर्चा आहे. व संग्रामपूर तालुक्यातील वानखेड भाग-2 मधील तलाठी कार्यालयातील कोतवाल योगेश रावणकार हा गेल्या अनेक वर्षापासून पुणे येथे रहायला आहे.परंतु त्यांच्या जागेवर मंडल अधिकारी हरीभाऊ उकर्डे यांच्या आशीर्वादाने फर्जी कोतवाल’ बनून योगेश याचे वडील काम करत आहे.
फर्जी.कोतवाल बाबत बातमी प्रसारित होताच नऊ मे रोजी झालेल्या कोतवालाच्या मीटिंगमध्ये तहसीलदार सिद्धेश्वर वरणगावकर यांनी सर्व कोतवाल यांना त्यांच्या तलाठी कार्यालयात स्वतः हजर राहावे त्यांच्या जागेवर त्यांच्या घरातील इतर कोणताही व्यक्ती आढळून आल्यास त्यावर कडक कारवाई केली जाईल असे आदेश काढले असताना सुद्धा मागील दोन दिवसापासून वानखेड भाग 2 मधील कोतवाल योगेश रावनकार हे त्यांच्या कार्यालयात हजर दिसून येत नाही. याचाच अर्थ तहसीलदार यांच्या आदेशाला वानखेड येथील कोतवाल योगेश रावणकार यांनी केराची टोपली दाखवली एवढे मात्र निश्चित.
या बाबत 10 मे रोजी आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर पाटील दांदळे यांनी कोतवाल योगेश रावणकार हे त्यांच्या हलक्यावर वानखेड भाग-2 ला कर्तव्यावर हजर नसल्यामुळे संबंधित तलाठी ए.व्हि. कस्तुरे यांच्यासोबत भ्रमणध्वनीवरून संपर्क साधला असता त्यांना कोतवाल योगेश रावणकार हे कार्यालयात हजर नव्हते आणि त्याबाबत आपणाकडे सुट्टीचा अर्ज सुध्दा दिलेला नाही तसेच तहसील कार्यालयातून सुद्धा मला कोतवाल योगेश रावणकार बद्दल कुठल्याही सुट्टीच्या अर्जा बाबत माहिती मिळाली नाही. असे तलाठी कस्तुरे यांनी सांगितले या सर्व प्रकारावरून असे दिसून येते संबंधित कोतवाल यांच्यावर महसूल विभागातील काही वरिष्ठ अधिकारी चांगलेच मेहरबान असल्याचे समजते… मंडळ अधिकारी तथा प्रभारी नायब तहसीलदार हरिभाऊ उकर्डे यांचेच कोतवाल योगेश रावणकार यास अभय असल्याची चर्चा परिसरात होत आहे. किंवा कोतवाल यांचे वडील आणि मंडळ अधिकारी यांच्यामध्ये आर्थिक व्यवहार तर नाही ना अशीसुद्धा कुजबुज तालुक्यात होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here