Home अमरावती खासदार नवनीत राणा यांना पाकिस्तान मधून मारण्याची धमकी; रवी राणाचा ओवेसीवर गंभीर...

खासदार नवनीत राणा यांना पाकिस्तान मधून मारण्याची धमकी; रवी राणाचा ओवेसीवर गंभीर आरोप.

26
0

आशाताई बच्छाव

IMG_20240307_050848.jpg

खासदार नवनीत राणा यांना पाकिस्तान मधून मारण्याची धमकी; रवी राणाचा ओवेसीवर गंभीर आरोप.
———-
दैनिक युवा मराठा
पी एन देशमुख.
अमरावती जिल्हा प्रतिनिधी.
अमरावती.
अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांना दिवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. नवनीत राणा यांनी धमकी पाकिस्तान किंवा अफगाणिस्तानातून देण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यामुळे याप्रकरणी राजापेठ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून या प्रकरणाचे गंभीर्य पाहता पोलिसांनी तात्काळ तपासून केला आहे. दरम्यान आमदार रवी राणा यांनी या धमकी प्रकरणाची तक्रार गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पोलीस महासंचालकाकडे केली असल्याची माहिती दिली. एम आय आमचे प्रमुख खासदार असुद्दीन ओवेसी आणि इम्तियाज जलील यांच्या सांगण्यावरूनच नवनीत राणा यांना धमकी आल्याचे दावा देखील आमदार रवी राणा यांनी केला आहे. अमरावतीच्या खासदार असलेल्या नवनीत राणा या आगामी लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या चिन्हावर निवडणुकीला समोर जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यादरम्यान गेल्या काही दिवसात त्यांनी हिंदुत्वाचा मुद्दा लावून धरला आहे. त्यामुळे आगामी काळात या हिंदुत्वाच्या मुद्द्यावर नवनीत राणा लोकसभा निवडणुकीला समोर जाणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. यादरम्यान आता नवनीत राणा यांना पाकिस्तान आणि अफगाणिस्तान मधून धमकी आली आहे. यादी देखील खासदार नवनीत राणा यांना अशा पद्धतीने व्हाट्सअप वर धमकी देण्यात आली होती. मात्र, त्यावेळी धमकी देणाऱ्याला पोलिसांनी ताब्यात घेतले होते. या दरम्यान आता नवनीत राणा यांना पाकिस्तान किंवा अफगाणिस्तान मधून केली आहे या प्रकरणी गंभीर्य लक्षात एम आय एम चे प्रमुख असुद्दिन ओवेसी यांच्यावर आमदार रवी राणा यांचा आरोप आहे. याप्रकरणी आमदार रवी राणा यांनी एमआयएमचे प्रमुख असुद्दीन वसीम व खासदार यांच्यावर गंभीर आरोप केलेले आहे. खासदार नवनीत राणा या संसदेमध्ये कायमच हिंदुत्वाचा मुद्दा मांडत आहे. त्यामुळे त्यांना धमकी देण्यात येत असल्याचे आमदार रवी राणा यांनी म्हटले आहे. याप्रकरणी खासदार ओबीसी आणि धमकी देणाऱ्या व्यक्तींमध्ये काही लिंक आहे का? याचा तपास करण्याची मागणी देखील आमदार रवी राणा यांनी केली आहे. या संदर्भात आपण पोलीस महासंचालकांनी राज्याचे गृहमंत्री आणि राज्याचे गृहमंत्री यांच्याकडे तक्रार केली असल्याची माहिती देखील आमदार रवी राणा यांनी दिली आहे.

Previous articleगावठी कट्टा कमरेला लावून फिरणारा तरुण जेरबंद; एलसीबीची कार्यवाई
Next articleअमरावती जिल्ह्यातील सातेगाव येथील युवा शेतकऱ्यांची गळफास घेऊन आत्महत्या.
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here