Home अमरावती अमरावती जिल्ह्यातील सातेगाव येथील युवा शेतकऱ्यांची गळफास घेऊन आत्महत्या.

अमरावती जिल्ह्यातील सातेगाव येथील युवा शेतकऱ्यांची गळफास घेऊन आत्महत्या.

111

आशाताई बच्छाव

IMG_20240307_051202.jpg

अमरावती जिल्ह्यातील सातेगाव येथील युवा शेतकऱ्यांची गळफास घेऊन आत्महत्या.
दैनिक युवा मराठा
पी.एन.
देशमुख.
अमरावती जिल्हा विभागीय संपादक.
अमरावती.
अमरावती जिल्ह्यातील सातेगाव येथील दीपक मनोहर निर्मळ या ३५ वर्षीय शेतकऱ्याने सततची नापिकी व कर्जाला कंटाळून आत्महत्या केली. ही घटना आज मंगळवारी दुपारी चारच्या दरम्यान उघडकीस आली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दीपक ने स्वतःच्या घरात गळफास घेऊन जीवन यात्रा संपवली. दीपक यांच्याकडे सामूहिक १२ एकर कोरडवाहू शेती असून त्याच्यावर शेती तसेच ट्रॅक्टरचे कर्ज आहे. एकंदरीत सहा ते सात लाख रुपये कर्जाचा मोजा असल्यामुळे तो विवंचनेत होता. सतत होत असलेल्या नापिकी आणि बँक का व खाजगी विकते संस्थेचे कर्ज कसे फेडायचे, घर कसे चालवायचे हे प्रश्न त्याला सतावत होते. या विवंचनेत दीपक ने मृत्यूला जवळ केले. मोठा भाऊ तसेच पत्नी एक मुलगा एक मुलगी व बराच मोठा आप्तपरिवार आहे. दीपक ने एकाकी मृत्यूला जवळ केल्याने संपूर्ण सातेगाव हळहळ व्यक्त होत आहे. पुढील चौकशी अंजनगाव सुर्जी पोलीस करीत आहे.