🛑 महिनाभरात एकही पाँझिटिव्ह रुग्ण नाही! 🛑
✍️ ( विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )
कोल्हापूर :⭕दररोज प्रशासनाची चिंता आणि नागरिकांत भीती वाढवणार्या कोरोना रुग्णवाढीला रविवारी तब्बल एक महिन्याने ब—ेक लागला. दिवसभरात एकही नवा रुग्ण आढळून आला नाही. प्रशासनाला प्राप्त झालेल्या 106 अहवालांपैकी 105 निगेटिव्ह आले तर एक अहवाल नाकारण्यात आला. रात्री 12 वाजेपर्यंत ही स्थिती होती. आणखी 17 जण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना रुग्णालयातून घरी पाठवण्यात आले. यामुळे जिल्ह्यात कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या 629 इतकी तर बाधितांची संख्या 720 इतकी राहिली.
जिल्ह्यासाठी रविवार दिलासादायक ठरला. दिवसभरात एकही पॉझिटिव्ह रुग्णाची भर पडली नाही.
मात्र, कोरोनातून बरे होणार्यांच्या संख्येत 17 जणांची भर पडली. यामुळे जिल्ह्यात आज कोरोनामुक्तीचा वेग 87.36 टक्क्यांपर्यंत वाढला. कोरोनातून बरे झालेल्यांची संख्या 629 झाल्याने रुग्णालयात उपचार घेणार्यांची संख्या आता 83 इतकी राहिली आहे.
जिल्ह्यात 26 मार्च रोजी पहिला रुग्ण आढळला होता. त्यानंतर दि. 9 मे पर्यंत जिल्ह्याची रुग्णसंख्या केवळ 15 पर्यंत गेली होती. त्यातही 10 रुग्ण बरे होऊन घरी परतले होते तर एकाचा मृत्यू झाला होता. जिल्ह्यात त्यावेळी अॅक्टिव्ह रुग्ण केवळ चार होते. मात्र, दि. 3 मे पासून जिल्ह्यात पुणे, मुंबई आदी रेड झोनमधून मोठ्या संख्येने लोक दाखल होऊ लागले. परिणामी बाहेरून आलेले नागरिक तपासणीत पॉझिटिव्ह आढळून येऊ लागले.
जिल्ह्यात 12 मे पासून दररोज पॉझिटिव्ह रुग्ण आढळून येत होते. दररोज पॉझिटिव्ह येणार्या रुग्णांची संख्या वाढतच जात होती. दररोज वाढणार्या रुग्णसंख्येमुळे नागरिकांत भीतीचे वातावरण होते. दररोज वाढणारी संख्या प्रशासनाच्या चिंतेत भर टाकत होती. दि. 3 जून पासून दैनदिन रुग्णसंख्या कमी झाली. मात्र, दररोज रुग्ण आढळूनच येत होते. दि.12 मे ते दि. 13 जून या केवळ हिन्याभराच्या कालावधीत जिल्ह्यात तब्बल 702 रुग्ण आढळून आले. आज दिवसभरात मात्र, जिल्ह्यात एकही नवा रुग्ण आढळून आला नाही.⭕
