Home बीड गावठी कट्टा कमरेला लावून फिरणारा तरुण जेरबंद; एलसीबीची कार्यवाई

गावठी कट्टा कमरेला लावून फिरणारा तरुण जेरबंद; एलसीबीची कार्यवाई

32
0

आशाताई बच्छाव

IMG_20240307_044152.jpg

गावठी कट्टा कमरेला लावून फिरणारा तरुण जेरबंद; एलसीबीची कार्यवाई

मोहन चव्हाण
ब्युरो चीफ बीड जिल्हा

बीड दि: ०६  एक तरुण गावठी कट्टा कमरेला लावून फिरत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली. माहिती मिळताच सापळा लावत शहरातील तुळजाई चौकात या तरुणाला बेड्या ठोकल्या ही कार्यवाही मंगळवारी सकाळी करण्यात आली. राहुल प्रकाश तुपे वय २७ वर्ष रा. शिरापूर ता. शिरूर ह.मु. बीड असे पकडलेल्या आरोपीचे नाव आहे. तो कमरेला गावठी कट्टा लावून शहरात फिरत होता. ही माहिती मंगळवारी सकाळी स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली. त्यांनी लगेच राहुल तुपेचा शोध घेण्यास लगेच सुरुवात केली. तो तुळजाई चौकात असल्याचे समजताच एलसीबीच्या पथकाने सापळा लावला. तो दिसताच त्याला पकडले त्याची अंगझडती घेतली असता त्याच्या कमरेला गावठी कट्टा आढळून आला. पोलिसांनी तो जप्त केला असून तीन जिवंत काढतूसही जप्त केले आहेत. त्याला शिवाजीनगर पोलिसांच्या स्वाधीन केले असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. ही कार्यवाही पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर, अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संतोष साबळे , उपनिरीक्षक श्रीराम खटावकर, हवालदार मनोज वाघ, प्रसाद कदम, विकास वाघमारे, सोमनाथ वाघमारे, सचिन आंधळे, सुनील राठोड, विकी सुरवसे, नारायण कोरडे आदींनी केली.

Previous articleआयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत ऐटीत व रुबाबात जीवन जगणारे आवारे बाबा—-
Next articleखासदार नवनीत राणा यांना पाकिस्तान मधून मारण्याची धमकी; रवी राणाचा ओवेसीवर गंभीर आरोप.
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here