Home कोकण 🛑 “वसई दुर्ग दीपोत्सव” उत्साहात साजरा 🛑

🛑 “वसई दुर्ग दीपोत्सव” उत्साहात साजरा 🛑

108
0

राजेंद्र पाटील राऊत

🛑 “वसई दुर्ग दीपोत्सव” उत्साहात साजरा 🛑
✍️ वसई 🙁 विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )

वसई :⭕२१०० दिव्यांनी उजळला वसई किल्ला !
वीर मराठा सेना व कोव्हीड योध्यानच्या सन्मानार्थ यावर्षी चा दीपोत्सव !

धर्मांध पोर्तुगीजांच्या जाचातून वसईकरांना मुक्त करण्यासाठी २१००० मराठे हुतात्मा झाले. आपल्या घरी दिवाळी- दसरा साजरी व्हावा म्हणून त्यांनी आपल्यासाठी बलिदान दिले. स्वतःच्या कुटुंबाचा व जीवाचा त्याग केला. दिवाळीत एकीकडे संपूर्ण वसई – विरार शहर, घरे, दुकाने, मंदिर , चर्च, मॉल्स, रस्ते प्रकाशमान होऊन झगमगत असतात तर दुसरीकडे पराक्रमी मराठा सैन्याच्या शौर्याचा व बलिदानाचा साक्षीदार असलेला वसईचा किल्ला (नागेश महातीर्थ) मात्र अंधारात असतो. पूर्वापार अनेक परिवार व धर्मसभा वसई किल्ल्यातील नागेश महातीर्थावर दीपावली साजरी करतात.

मराठा सैन्यामुळे, भारतीय जवानांमूळे व कोव्हिड योध्यांमूळे आपण आज दिवाळी आनंदात साजरी करीत आहोत. त्या पराक्रमी सैन्यास मानवंदना अर्पण करण्यासाठी टीम “आमची वसई” ने दर वर्षी प्रमाणे वसई किल्ल्यात दिपोत्सव साजरी करण्याचे ठरविले. दिपोत्सवात पणत्या प्रज्वलित करून भव्य आकाश कंदिल उजळवण्यात आला. मशालींच्या दिमाखदार उजेडात, वाद्यांच्या गजरात व जय वज्राई-जय चिमाजी च्या जयघोषात अवघे वातावरण दुमदुमले होते.

फेथांध पोर्तुगीजांना जसे छत्रपतींच्या वीर मराठा सैन्याने वसईतून समूळ खणून काढले तसेच कोव्हिड योध्यांच्या प्रयत्नाने व सामान्य जनतेच्या सहकार्याने चायना व्हायरस भारतातून समूळ नष्ट होवो या भावनेने व कोव्हिड योध्यांच्या सन्मानार्थ या वर्षीचा दीपोत्सव साजरा केला असे सांगत आमची वसई सदस्यांनी समस्त वसईकरांना दीपावलीच्या शुभेच्छा प्रेषित केल्या…⭕

Previous article🛑 मराठा आरक्षणासाठी ” सर्वोच्च न्यायालयात” चौथ्यांदा अर्ज सादर करणार 🛑
Next article🛑 स्वराज्याचे शिलेदार प्रतिष्ठान आयोजित खेडमध्ये दीपमहोत्सव 🛑
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here