Home नांदेड देगलूर महाविद्यालयात १ मार्च रोजी पदवी वितरण सोहळा संपन्न

देगलूर महाविद्यालयात १ मार्च रोजी पदवी वितरण सोहळा संपन्न

23
0

आशाताई बच्छाव

IMG_20240302_084125.jpg

देगलूर महाविद्यालयात १ मार्च रोजी पदवी वितरण सोहळा संपन्न

देगलूर तालुका प्रतिनिधी,(गजानन शिंदे)

देगलूर- देगलूर महाविद्यालय, देगलूर अंतर्गत पदवी – पदव्युत्तर शिक्षण घेऊन उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी २६वा पदवी प्रमाणपत्र वितरण समारंभ ०१ मार्च २०२४ रोजी मान्यवरांच्या उपस्थितीत आयोजीत करण्यात आला आहे.
या कार्यक्रमासाठी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक मा. डॉ. दिगंबर नेटके हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. समारंभाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष मा. प्रकाश पाटील बेंबरेकर हे असतील. तर अडत व्यापारी शिक्षण संस्थेचे सचिव श्री शशिकांत चिद्रावार, प्राचार्य डॉ. मोहन खताळ यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
कार्यक्रमास संस्थेचे उपाध्यक्ष श्री नारायणराव मैलागीरे, सहसचिव श्री सूर्यकांत नारलावार, कोषाध्यक्ष श्री विलास तोटावार, कार्यकारिणी सदस्य श्री राजकुमार महाजन, डॉ. कर्मवीर उनग्रतवार , श्री जनार्धन चिद्रावार, श्री गंगाधर जोशी, श्री रवींद्र द्याडे, श्री देवेंद्र मोतेवार, सदस्य श्री चंद्रकांत नारलावार हे उपस्थित राहणार आहेत.
तसेच उपप्राचार्य डॉ. अनिल चिद्रावार, परीक्षा विभागाचे प्रमुख डॉ. राजेश्वर दुडूकनाळे, महाविद्यालय विकास समितीचे सदस्य डॉ. संजय पाटील, डॉ. सर्जेराव रणखांब, डॉ. किशन सुनेवार, डॉ. सुदाम लक्ष्मणकुमार, श्री राजू जंगीलवार यांचीही उपस्थिती राहणार आहे.
हिवाळी २०२२ आणि उन्हाळी २०२३ या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनी पदवी प्रमाणपत्र प्रत्यक्ष घेण्यासाठी विद्यापीठास विहित नमुन्यात अर्ज सादर केला आहे, अशा विद्यार्थ्यांना सदर कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते पदवी प्रमाणपत्र वितरीत करण्यात येणार आहे. संबंधित विद्यार्थ्यांनी सकाळी ९.३० वाजता महाविद्यालयात येऊन प्रशांत चौव्हाण व प्रकाश सोनकांबळे यांच्याकडे नोंदणी करून समारंभास उपस्थित राहावे, असे आवाहन महाविद्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे. समारंभाच्या यशस्वीतेसाठी परीक्षा समितीतील व नियोजन समितीतील सर्व सदस्य, कार्यालयीन अधीक्षक श्री गोविंद जोशी प्रयत्नशील आहे.

Previous articleअशोकराव चव्हाण यांच्या उपस्थित कुंडलवाडी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती व बहुसंख्य संचालक यांचा भारतीय जनता पक्षात प्रवेश.
Next articleदेगाव मधे सार्वजनिक शिवजन्मोत्सव सोहळा 2024 उत्साहात संपन्न.
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here