Home भंडारा व्यसनमुक्ती संकल्प सोहळा व भव्य आरोग्य शिबीर शिबिराचे 8 मार्चला महादेवाच्या प्रतापगडावर...

व्यसनमुक्ती संकल्प सोहळा व भव्य आरोग्य शिबीर शिबिराचे 8 मार्चला महादेवाच्या प्रतापगडावर आयोजन

23
0

आशाताई बच्छाव

IMG_20240307_052014.jpg

व्यसनमुक्ती संकल्प सोहळा व भव्य आरोग्य शिबीर शिबिराचे 8 मार्चला महादेवाच्या प्रतापगडावर आयोजन

 

गोंदिया( संजीव भांबोरे) मोरगाव अर्जुनी तालुक्यातील महादेवाच्या प्रतापगडावर कहालकर दुःख निवारक दवाखाना भंडारा शिवतीर्थ मानव कल्याणकारी बहुउद्देशीय संस्था व सत्यसाई संस्था भंडारा यांच्या संयुक्त विद्यमाने महाशिवरात्रीनिमित्त लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या महादेवाच्या प्रतापगडावर दि. 08 मार्चला एकदिवसीय व्यसनमुक्ती संकल्प सोहळा, शिव आराधना, व भव्य आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

शिवतीर्थ मानव कल्याणकारी बहुउद्देशीय संस्था खराशी, सिद्ध साक्षी आनंददाम किटाळी, कहालकर दुःखनिवारक दवाखाना भंडारा, सत्यसाई संस्था भंडारा, विजन अकॅडमी शाखा भंडारा व शाखा लाखनी, संत ज्ञानेश्वर माऊली सेवाश्रम टेकेपार यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 8 मार्च ला हा उपक्रम सकाळी 8 वाजता पासून आयोजित करण्यात आलेला आहे. यात विविध आजारांबाबत तपासणी व रुग्णांना मोफत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. तसेच औषधांचे वाटप सुद्धा केले जाणार आहे.

यासाठी संस्थेचे उपाध्यक्ष डॉ. अक्षय कहालकर, पंकज कहालकर, व्यसनमुक्तीचे आजीवन प्रचारक डमदेवजी कहालकर, सत्य साई संस्थानचे श्री. नागपुरे, श्री. माहुले, विजन अकॅडमी शाखा भंडारा व शाखा लाखनीचे प्रा. डॉ. खोब्रागडे, संस्थेचे अध्यक्ष प्रेषिताताई कहालकर, सचिव मीराताई कहालकर, सहसचिव रामदास कामठे, संचालक नरेश टिचकुले, शिरीष निर्वाण, प्रतापगडचे सरपंच भोजराज रोकडे, उपसरपंच उमेश मडावी आदी सहकार्य करीत आहेत.

Previous articleविभागीय क्रीडा संकुलाचे नूतनीकरण व क्रीडा सेवांच्या विस्तारित बांधकामांच्या २९ कोटींच्या अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता
Next articleशासनाने अभियंत्यांच्या काम वाटपाच्या कोट्यात केली वाढ!
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here