Home वाशिम आज जिल्हा विधीज्ञ मंडळाच्या वतीने उच्च न्यायालय नागपूर खंडपीठाचे न्यायमुर्ती श्री जि.ए....

आज जिल्हा विधीज्ञ मंडळाच्या वतीने उच्च न्यायालय नागपूर खंडपीठाचे न्यायमुर्ती श्री जि.ए. सानप यांच्या सत्काराचा कार्यक्रम

86
0

आशाताई बच्छाव

IMG_20240224_072413.jpg

आज जिल्हा विधीज्ञ मंडळाच्या वतीने उच्च न्यायालय नागपूर खंडपीठाचे न्यायमुर्ती श्री जि.ए. सानप यांच्या सत्काराचा कार्यक्रम

वाशिम,(गोपाल तिवारी ब्युरो चीफ)- जिल्हयातील रहिवासी व उच्च न्यायालय नागपूर खंडपीठाचे न्यायमुर्ती तथा पालक न्यायमुर्ती जि.ए. सानप यांचा त्यांच्या उत्कृष्ट कार्याबद्दल वाशिम जिल्हा विधिज्ञ मंडळाच्या वतीने शनिवार, २४ फेब्रुवारी रोजी स्थानिक काळे लॉन येथे सत्काराच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
जि. ए. सानप साहेब हे वाशिम जिल्हा विधीज्ञ मंडळाचे माजी सदस्य आहेत. सन १९९६ पासुन सानप यांनी मुंबईत न्यायाधिश म्हणुन आपले कर्तव्य बजावायला सुरूवात केली. सन २००८ मध्ये त्यांनी नाशिक जिल्हा व सत्र न्यायाधिश म्हणुन तसेच सन २०१० मध्ये उच्च न्यायालय मुंबई उच्च न्यायालय येथे रजिस्टर म्हनुन चोखरित्या कामकाज पार पाडले आहे. त्यांनी सन २०११ मध्ये मुंबई बॉम्बस्पोट प्रकरण आणि टाडा अंतर्गत इतर प्रकरणे उत्कृष्टरित्या हाताळली आहेत. ९ मार्च २०२३ रोजी श्री. सानप यांना पदोन्नती मिळाली आणि ते मुंबई उच्च न्यायालय खंडपीठ नागपुर येथे न्यायमुर्ती म्हणुन उत्कृष्टरित्या काम करीत आहेत. ते वाशिम जिल्हयाचे रहिवासी व वाशिम जिल्हा विधीज्ञ मंडळाचे माजी सदस्य म्हणुन त्यांनी वाशिम जिल्हयाचे नाव न्यायालयीन क्षेत्रात उज्वल केले आहे, त्यांच्या या उत्कृष्ट कार्याचा सन्मान म्हणुन वाशिम जिल्हा विधीज्ञ मंडळाच्या वतीने त्यांच्या सत्काराच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सदर कार्यक्रमात जिल्हयातील जे विधीज्ञ न्यायालयीन क्षेत्रात न्यायाधिश म्हणुन आपले कर्तव्य पार पाडीत आहेत. त्यांचा सुध्दा सन्मान या कार्यक्रमात होणार असल्याची माहिती मंडळाचे उपाध्यक्ष अ‍ॅड. वैभव तिफने यांनी दिली.

Previous articleमाजी महापौर सौ. जयश्रीताई महाजन यांची पत्रकार परिषद
Next articleपरळीत ब्राह्मण ऐक्य परिषदेच्या कार्यक्रमासाठी रस्ता मोकळा करून द्या असे आंदोलकांना आव्हान – मनोज जरांगे
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here