Home सामाजिक त्या वळणावर

त्या वळणावर

102
0

आशाताई बच्छाव

IMG_20240211_070759.jpg

त्या वळणावर

काॅफी हाऊस मधील टेबलावर मनीषा आणि श्रीधर बसले होते.हातातील काॅफी पिताना कधीकधी एकमेकांकडे बघत होते.दोघांच्याही मनात काहीतरी सुरू होतं.पण त्यांना एकमेकांच्या मनातील भाव वाचता येत नव्हते.त्यांची भेटण्याची ही पहिलीच वेळ होती.काॅफी पिऊन झाल्यावर श्रीधर मनीषाला म्हणाला -“आता आपल्याला निघायला हवं.बराच वेळ झाला आहे.मला कंपनीत जाऊन पाहिले पाहिजे काय सुरू आहे.” श्रीधर अतिशय देखणा होता तर मनीषाही काही कमी नव्हती.चाफेकळी नाक, सुंदर टपोरे डोळे,लांब कुरळे केस कुणालाही भुरळ घालेल असे तिचे सौंदर्य होते. ती एका काॅरपोरेट बॅंकेत मॅनेजर होती.त्याच बॅंकेत श्रीधरचे बिझनेस अकाउंट होते त्यामुळे त्याचे बॅंकेत नेहमीच येणे-जाणे असायचे.तेव्हाच त्याची आणि मनीषाची ओळख झाली.श्रीधरचे बोलणे ऐकून मनीषा भानावर येऊन म्हणाली -“हो,खरंच वेळ झालाय”.मनीषा आणि श्रीधर आपापल्या कारने निघाले.कारने घरी परतत असताना मनीषा मनात विचार करत होती -“श्रीधरने मला काॅफीसाठी का विचारले असेल?त्याच्याकडे पाहून तर वाटतं की त्याचं लग्न झालं असावं.” विचार करत असताना कार तिच्या घरासमोर येऊन थांबली आणि तिच्या मनातील विचारांचा गोंधळ थांबला.
दुसऱ्या दिवशी सकाळी श्रीधरचा तिला फोन आला.मनीषाने फोन उचलला.तिकडून श्रीधरचा आवाज ऐकू आला.श्रीधर म्हणाला -” हॅलो मनीषा,आज डिनर करायला तुम्ही माझ्यासोबत याल का?” मनीषा थोडी गोंधळली पण लगेच स्वतःला सावरत म्हणाली -“मी डिनर रोज घरातील माणसांसोबतच करते.” यावर श्रीधर म्हणाला -” ठिक आहे,पण आपण काॅफीसाठी तर सोबत जाऊ शकतो.मी संध्याकाळी पाच वाजता तुम्हाला घ्यायला येतो.तयार रहा.” असे बोलून श्रीधरने फोन बंद केला.श्रीधर ठीक संध्याकाळी पाच वाजता मनीषाला घ्यायला आला.मनीषाही त्याच्या येण्याची वाट पहात होती.काॅफी पिताना श्रीधर मनीषाला म्हणाला -“तुम्ही इतक्या सर्व जवाबदा-या कशा सांभाळता?घरचे आणि बॅंकेतील काम करताना तुम्हाला थकवा येत नाही का?यावर मनीषा श्रीधरला म्हणाली -” त्यात काय एवढं.बायका घर सांभाळून नोकरी सुध्दा चांगल्या प्रकारे करू शकतात.पहिलेच्या बायकांची गोष्ट वेगळी होती.आता स्त्रियाही पुरूषांच्या बरोबरीने काम करतातच ना.”मनीषाने हसतच उत्तर दिले.” “म्हणूनच तर मी तुमच्या व्यक्तीमत्वाने प्रभावित झालो.”श्रीधर हसत म्हणाला.आज दोघेही खूप दिलखुलासपणे बोलत होते.” तुमच्या घरी कोण कोण असतं?”मनीषाने श्रीधरला विचारले.यावर श्रीधर म्हणाला -“मी आणि फक्त मी”मनीषाने आश्चर्याने त्याला विचारले -“म्हणजे? तुम्ही लग्न नाही केले अजून?मला वाटले की तुमचे लग्न झाले आहे आणि तुम्हाला मुलेपण असतील.”यावर श्रीधर म्हणाला -” तुम्हाला असं वाटलं यात तुमची काही चूक नाही.माझं वय थोडं जास्त झाल्यामुळे तुम्हाला हा प्रश्न पडणं स्वाभाविक आहे.एक मुलगी मला पसंत होती.पण वैचारिक ताळमेळ न जमल्यामुळे आमचं नातं फार काळ नाही टिकू शकलं.” मनीषा त्याच्या सर्व गोष्टी लक्षपूर्वक ऐकत होती. ” आता आपण निघायला हवं” मनीषा श्रीधरला म्हणाली.ते दोघेही काॅफी हाऊस मधून बाहेर पडले.
कार चालवताना तिच्या डोक्यात विचारांची गर्दी व्हायला लागली….. श्रीधर अविवाहित आहे त्यामुळे तर तो माझ्याशी इतक्या सलगीने वागत नसेल ना?पुढेही मनीषा आणि श्रीधर असेच भेटत राहीले.कधी बिझनेसच्या गप्पा तर कधी थट्टामस्करी त्यांच्यात चालायची.
अशातच एक दिवस मनिषाला श्रीधरचा फोन आला.तिला परत श्रीधरने काॅफी हाऊस मध्ये भेटायला बोलावले.पण यावेळी तिने नकार दिला.श्रीधरने कारण विचारले तर मनीषाने सांगितले की तिच्या मुलीला बरं नाही.हे ऐकून श्रीधर एकदम गप्प झाला आणि त्याने फोन ठेवून दिला.त्याला एवढ्यावेळा भेटून सुध्दा मनीषाने कधी आपल्या घरच्यांविषयी काहीच सांगितले नव्हते.जेव्हा श्रीधर तिच्याकडे याबद्दल चौकशी करायचा तेव्हा ती त्याला नेहमीच उडवाउडवीची उत्तरे देत असे.त्याने कधी विचारही केला नव्हता की तिला मुलगी असेल.मनीषा आता विचार करू लागली…माझ्या मुलीबद्दल सांगताच त्याने फोन का बरं बंद केला असेल?जगातले सर्व पुरुष एकसारखेच असतात.त्यांचे विचारही सारखेच असतात.या विचारातच तिचा डोळा कधी लागला तिलाही कळले नाही.मनीषा श्रीधरच्या अशा वागण्याने अस्वस्थ झाली होती.तिने आज स्वतःच श्रीधरला फोन केला-” श्रीधर आज तुम्ही मला काॅफी हाऊस मध्ये भेटायला येऊ शकता?तुमच्याशी काही महत्त्वाचे बोलायचे आहे.”श्रीधर म्हणाला -” ठीक आहे.मी पाच वाजता पोहचतो तेथे.”दोघेही पाच वाजता काॅफी हाऊसला आले.नेहमी खूप बोलणारा श्रीधर आज खूप गप्प होता.काॅफी घेताना मनीषा श्रीधरला म्हणाली -” काय झालं श्रीधर?तुम्ही माझ्या मुलीबद्दल ऐकून गप्प झालात अगदी.” यावर श्रीधर म्हणाला -“मला तुमच्याबद्दल सर्वकाही जाणून घ्यायचे आहे.पण हिंमत होत नव्हती काही विचारण्याची.म्हणून मी गप्प बसलो.”मनीषाने स्वतः बद्दल सांगायला सुरुवात केली. तान्या माझी मुलगी नाही.मी तिला दत्तक घेतले आहे.ज्यावेळी लग्नाचं वय होतं तेव्हा लग्न केलं नाही.आता आई,मी आणि माझी मुलगी असे तिघेच घरी असतो.घरी दमून गेल्यावर तिला जवळ घेऊन माझा थकवा कुठल्या कुठे गायब होतो.तान्याला दत्तक घेतल्यानंतर मी लग्नाचा विचारही केला नाही.असा कोणी मिळणं सोपं नाही जो तान्यासह मला स्विकारेल.” एक दीर्घ श्वास घेत मनीषाने सर्व श्रीधरला सांगून टाकले.
वातावरण थोडं गंभीर झालं होतं.श्रीधर हसत मनीषाला म्हणाला – “तुला तुझ्या मुलीसकट स्विकारणारा मुलगा तुझ्या समोरच तर बसलाय.मला तुझ्याशी लग्न करायला आवडेल.तू करशील लग्न माझ्याशी?”श्रीधरचे बोलणे ऐकून मनीषाला खूप आनंद झाला.तिच्या डोळ्यांत आनंदाश्रू तरळले.तिने श्रीधरकडे एक कटाक्ष टाकला आणि लाजत उत्तर दिले..हो!

लैलेशा भुरे
नागपूर

Previous articleएसटीच्या सर्व वाहकांवर शंका घेणाऱ्यानी अनेक अधिकारी रंगेहाथ पकडले गेले होते त्या वेळी का परिपत्रक का काढले नाही?..
Next article🙏💚 मनन चिंतन 🌹 विषय:- शुभ भावना व विश्व कल्याण.
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here