Home वाशिम एसटीच्या सर्व वाहकांवर शंका घेणाऱ्यानी अनेक अधिकारी रंगेहाथ पकडले गेले होते त्या...

एसटीच्या सर्व वाहकांवर शंका घेणाऱ्यानी अनेक अधिकारी रंगेहाथ पकडले गेले होते त्या वेळी का परिपत्रक का काढले नाही?..

109
0

आशाताई बच्छाव

IMG_20240211_070131.jpg

एसटीच्या सर्व वाहकांवर शंका घेणाऱ्यानी अनेक अधिकारी रंगेहाथ पकडले गेले होते त्या वेळी का परिपत्रक का काढले नाही?..

श्रीरंग बरगे यांचा सवाल?
मंगळूरपीर/वाशीम,(गोपाल तिवारी ब्युरो चीफ):-   ( ९ फेब्रुवारी)एका अपहाराच्या घटनेवरून एसटीच्या ३२ हजार वाहकांना संशयाच्या कठडयात उभे करून, वेठीस धरणे हा केवळ मूर्खपणा आहे. तसेच अपहार रोखण्यासाठी कर्तव्यावर असणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांच्या खिशात हात घालून झाडझडती घेण्याची परिपत्रकात भाषा करणाऱ्या अधिकाऱ्यांना ताबडतोब समज द्यावी अन्यथा प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर अशा अधिकाऱ्यांच्या उद्दामखोर वक्तव्यामुळे उद्रेक होऊन त्याचा परिणाम एसटीत पुन्हा न भूतो न भविष्यते अशा आंदोलनात होईल, तसे कमगरांमधील असंतोष पाहिल्यावर दिसून येत आहे.व अशी वेळ आणू नये, पुन्हा येऊ नये असा विनंती वजा इशारा महाराष्ट्र एस.टी. कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी दिला आहे.

वाशीम जिल्ह्यातील एसटीच्या मंगळूरपीर आगारासमोर झालेल्या कामगारांच्या मेळाव्यात ते बोलत होते. या वेळी इतर संघटना मधील १३० कर्मचाऱ्यांनी महाराष्ट्र एस. टी. कर्मचारी काँग्रेस या संघटनेत प्रवेश केला.

इस्लामपूर(सांगली जिल्हा) आगारांमध्ये एका वाहकाने मोबाईल मध्ये ॲप तयार करून डुप्लिकेट मशीन तयार करून त्यातून तिकीट विक्री करून अपहार केला व त्या द्वारे एसटी महामंडळाचे उत्पन्न बुडवण्याचा प्रकार घडला हे दुर्दैवी आहे.पण अशा घटनांमधून एसटीच्या तांत्रिक यंत्रणेच्या मर्यादा चव्हाट्यावर येत असताना व मध्यवर्ती संगणकीय कक्षाचे नियंत्रणाचे काम फेल झाले असताना ते सोडून राज्यातील सर्व वाहकांची तपासणी करावी,असे तुघलकी फर्मान वाहतूक विभागाच्या एका अधिकाऱ्याच्या सहिने काढले आहे. दुर्दैवाने या परिपत्रकामध्ये अधिकाऱ्यांनी महिला वाहकाच्या खिशात हात घालून त्यांची तपासणी करावी असे निर्देश दिले आहेत.अशा कृतीमुळे प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे मनोधैर्य खच्ची होत आहे.आणि भविष्यात आपल्या संस्थेबद्दल त्यांना आस्था राहत नाही यातून कर्मचाऱ्यांच्या मध्ये उद्रेक निर्माण होऊन आणखी एका मोठ्या आंदोलनाला आपल्याला तोंड द्यावे लागेल , अशी परिस्थिती निर्माण होऊ नये ,यासाठी अश्या बेजबाबदार अधिकाऱ्यांना एसटी प्रशासनाने समज द्यावी व परिपत्रकात बदल करून पुन्हा नव्याने परिपत्रक काढावे अन्यथा मोठ्या उद्रेकाला समोर जावे लागेल असा इशाराही याप्रसंगी बरगे यांनी दिला आहे.

पूर्व इतिहास पाहिला तर एसटीच्या अनेक अधिकाऱ्यांना वेगवेगळ्या घटनांमध्ये अँटी करप्शन अधिकाऱ्यांनी रंगेहाथ पकडले होते. त्या वेळी असे परिपत्रक का काढले नाही? अनेक अधिकाऱ्यांच्या खिशात हात घातला तर घबाड बाहेर येईल असेही बरगे यांनी या वेळी बोलताना सांगितले.

या वेळी संघटनेचे उपाध्यक्ष एम. टी. खान, प्रादेशिक सचिव मनीष बत्तुलवार, विभागीय कार्याध्यक्ष शंकरराव पाटकर, विभागीय सचिव अनिल भंगाळे, आगार सचिव किशोर मोरे, आगार अध्यक्ष नंदकुमार शहाकर, गजानन गावंडे, संदीप ठाकरे,हे उपस्थित होते.
या वेळी संघटनेच्या नवीन नाम फलकाचे अनावरण सुद्धा करण्यात आले.

Previous article३,००० अंगणवाडी ताईंना मिळणार स्मार्टफोन; ५१ दिवसांच्या संपानंतर अंगणवाडीतील किलबिलाट
Next articleत्या वळणावर
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here