Home बीड ३,००० अंगणवाडी ताईंना मिळणार स्मार्टफोन; ५१ दिवसांच्या संपानंतर अंगणवाडीतील किलबिलाट

३,००० अंगणवाडी ताईंना मिळणार स्मार्टफोन; ५१ दिवसांच्या संपानंतर अंगणवाडीतील किलबिलाट

23
0

आशाताई बच्छाव

IMG_20240211_065742.jpg

३,००० अंगणवाडी ताईंना मिळणार स्मार्टफोन; ५१ दिवसांच्या संपानंतर अंगणवाडीतील किलबिलाट

मोहन चव्हाण
ब्युरो चिफ बीड जिल्हा

बीड दि:१०  विविध मागणीसाठी अंगणवाडीताईंनी पुकारलेल्या संपामुळे राज्यातील अंगणवाडी ओस पडल्या. तब्बल ५१ दिवस चाललेल्या संपामुळे राज्य शासनाने अंगणवाडीताईंच्या काही मागण्या मान्य केल्याचे शाश्वती केले. त्यामुळे हा संप मागे घेण्यात आला असून बीड जिल्ह्यातला अंगणवाडीत किलबिलाट निर्माण होऊन जिल्ह्यात ०३ हजारावर अंगणवाडीच्या विविध मागण्यांसाठी राज्यभरात तब्बल ५१ दिवस चाललेल्या ताईंसह ८४ पर्यवेक्षकांना स्मार्टफोन मिळणार आहे. त्यामुळे ऑनलाईन चे कामे करण्यास अंगणवाडी ताईंना सुलभ होणार आहे. अंगणवाडी ताईंना २०१८-२०१९ मध्ये पोषण आहार कार्यक्रमांतर्गत पोषण ट्रॅकर ॲपद्वारे लाभार्थी यादी, त्यांचे वजन, हजेरी उंची स्तनदा माता, गर्भवती मातांची माहिती पोषण आहाराचे वाटप आदी माहिती नोंदी करण्यासाठी शासनाकडून मोबाईल देण्यात आले होते. परंतु मोबाईलच्या तांत्रिक अडचणींच्या तक्रारी वाढल्या अंगणवाडी ताईंसाठी डोके दुखी ठरु लागल्या होत्या. त्यामुळे अंगणवाडी सेविकांनी शासनाला मोबाईल परत करून शासनाला विविध मागणी दि:०४ डिसेंबर २०२३ पासून आंदोलनाचे हत्यार उपसले होते. तब्बल ५१ दिवस चाललेल्या संपाची शासनाने दखल घेऊन अंगणवाडी ताईंच्या काही मागण्या मान्य केल्या. त्यानुसार हा संप मागे घेण्यात आला असून आता अंगणवाडी सेविकांना नवीन मोबाईल कधी मिळणार ? याची उत्सुकता लागलेली आहे. बीड जिल्ह्यातील ग्रामीण भागात २८८६ तर शहरी भागात २०४ अंगणवाड्या आहेत. अशा एकूण ०३ हजार ९० अंगणवाडी सेविकांना व ८४ पर्यवेक्षिकांना स्मार्ट मोबाइल फोन जानेवारीत शासनाने घेतल्याने निर्णयानुसार मिळणार आहेत. त्यामुळे ऑनलाईन चे कामे करण्यात सुलभ होणार आहे.

Previous articleरिपब्लिकन पक्षाच्या नांदेड(दक्षिण) जिल्हा विभागाची मुखेड येथे बैठक.
Next articleएसटीच्या सर्व वाहकांवर शंका घेणाऱ्यानी अनेक अधिकारी रंगेहाथ पकडले गेले होते त्या वेळी का परिपत्रक का काढले नाही?..
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here