Home नाशिक धक्कादायक आजची दुर्दैवी दुर्घटना अनकाई किल्ल्यावरील तळ्यात पडून दोन युवकाचा मृत्यू !

धक्कादायक आजची दुर्दैवी दुर्घटना अनकाई किल्ल्यावरील तळ्यात पडून दोन युवकाचा मृत्यू !

68
0

आशाताई बच्छाव

IMG-20220816-WA0074.jpg

चांदवड/मनमाड,(सुनील गांगुर्ड प्रतिनिधी युवा मराठा न्युज नेटवर्क)   

दिनांक 16 ऑगस्ट अंकाई किल्ल्यावरील तळ्यामध्ये पडून दोन युवकांचा मृत्यू झाल्याची घटना दुपारी घडली आहे हे दोन्ही युवक अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव धरणगाव रोडच्या असल्याची माहिती समोर आली आहे मिलिंद रवींद्र जाधव वय 20 व रोहित पिंटू राठोड वय 14 राहणार कोपरगाव धरणगाव रोड असे मृत्यू युवकांचे नाव आहे श्रावण महिन्यात अंकाई किल्ल्यावर मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी असते तर पर्यटन स्थळ असल्यामुळे बरेच तरुण आनंद लुटण्यासाठी येतात या घटनेबाबत अधिक माहिती अशी की अगस्ती मुनींच्या दर्शनाला आलेल्या हे दोघे युवक तळ्यात आंघोळीसाठी गेले होते त्यातील एकाला पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने तो बुडाला असताना दुसरा त्याला वाचवण्यासाठी गेला तोही पाण्यात बुडाला यात दोघांचा बुडून मृत्यू झालेची दुर्दैवी घटना घडली किल्ल्यावरील असलेल्या काही जणांना याची माहिती मिळताच त्यांनी किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या अंकाई गावातील नागरिकांना याची माहिती दिल्यानंतर त्या दोघांचा मृतदेह तळ्यातून बाहेर काढण्यात आला

Previous articleपंचायत समिती समोर बसलेले उपोषण कर्ते अचानक गायब,तालुकभर एकच खळबळ…!
Next articleसमूह राष्ट्रगीत गायनासाठी जिल्ह्यातील प्रत्येक शाळा झाल्या सज्ज
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here