Home बीड पाणी टंचाई विरोधात दिंद्रुडकर आक्रमक; हंडे घेऊन बीड – परळी महामार्गावर केला...

पाणी टंचाई विरोधात दिंद्रुडकर आक्रमक; हंडे घेऊन बीड – परळी महामार्गावर केला रास्ता रोको

21
0

आशाताई बच्छाव

IMG_20240207_060931.jpg

पाणी टंचाई विरोधात दिंद्रुडकर आक्रमक; हंडे घेऊन बीड – परळी महामार्गावर केला रास्ता रोको

मोहन चव्हाण
ब्युरो चिफ बीड जिल्हा

बीड/दिंद्रुड दि:०६  जिल्ह्यात यंदा पाऊस अतिशय कमी पडल्याने दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. तर याच दुष्काळाच्या झळा आता गाव खेड्यात दिसू लागल्या आहेत. पाण्याची भीषण टंचाई जाणवत असल्याने अडवलेले जलजीवनचे काम पूर्ण होईपर्यंत गावात पाण्याचे टँकर सुरू करण्याची मागणी ग्रामस्थांकडुन होत आहे. मागणीसाठी दिंद्रुड येथील ग्रामस्थ आक्रमक झाले असून बीड-परळी महामार्गावर रास्ता रोको केला. या रास्ता रोको मुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे पाहायला मिळाले. फेब्रुवारी महिन्यातच राज्यातील विविध भागात दुष्काळाच्या झळा चालू लागल्या आहेत. यंदा राज्यातील अनेक भागात पाऊस कमी पडल्याने पाणी टंचाई जाणवत आहे. याच पार्श्वभूमीवर अडवलेले जलजीवनचे काम पूर्ण होईपर्यंत गावात पाण्याचे टँकर सुरू करा, अशी मागणी करत बीड जिल्ह्यातील दिंद्रुड येथील ग्रामस्थांनी बीड-परळी महामार्गावर रास्ता रोको सुरू केला. विशेष म्हणजे गतवर्षी फेब्रुवारी महिन्यात जलजीवनच्या कामाला सुरुवात करण्यात आली. मात्र हे काम पूर्ण न झाल्याने दिंद्रुड ग्रामस्थांवर दुष्काळाची वेळ आल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. जलजीवनच्या कामाला गती देऊन लवकरात लवकर पाणीपुरवठा सुरू होणे अपेक्षित आहे. असे असताना काही जणांनी या कामात भ्रष्टाचार होत असल्याच्या आरोपावरून काम बंद पडल्याने दिंद्रुडकरांवर पाण्याच्या भीषण टंचाईची वेळ आली आहे. जलजीवनचे काम लवकरात लवकर करावे व तोपर्यंत गावात पाण्याचे टँकर सुरू करण्यात यावे. अशी मागणी दिंद्रुड ग्रामस्थांनी केली आहे.

Previous articleधक्कादायक घटना परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या
Next articleविद्यार्थ्यांच्या कुंचल्याच्या फटकाऱ्यांनी श्रीरामपूरकर भारावले
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here