Home बीड धक्कादायक घटना परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

धक्कादायक घटना परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

30
0

आशाताई बच्छाव

IMG_20240207_060424.jpg

धक्कादायक घटना परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

मोहन चव्हाण
ब्युरो चिफ बीड जिल्हा

बीड/परळी दि:०६  रोजी परळी शहरातील पवनराजे अर्बन निधी या अर्थपेढीचे अध्यक्ष प्रल्हाद सावंत यांनी आज सायंकाळी सात वाजता आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. सध्याच्या परिस्थितीत पतसंस्था, मल्टीस्टेट यांच्या आर्थिक अडचणींच्या घटनांमध्ये वाढ झालेली आहे. बीड जिल्ह्यातील काही पतसंस्थांबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत. यातच आता परळी शहरातील मोठी आर्थिक उलाढाल आलेल्या पवनराजे अर्बन निधीचे अध्यक्ष प्रल्हाद सावंत यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना पुढे आली आहे. प्रेम प्रज्ञा नगर येथील एका अपार्टमेंट मध्ये प्रल्हाद सावंत यांनी काही दिवसापूर्वीच घर खरेदी केले होते. या घरात ते अद्याप राहिलाही गेले नव्हते. याच घरात त्यांनी आज दोरीने गळफास घेऊन त्यांनी आत्महत्या केल्याची माहिती समोर आली. घटनेने एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान आत्महत्याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. परळी शहर पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून त्यांच्या खिशात कागदपत्रे सापडले आहेत. यातून आत्महत्याचे कारण पुढे येण्याची शक्यता आहे. उत्तरीय तपासणीसाठी उपजिल्हा रुग्णालयात मृतदेह ठेवण्यात आला आहे.

Previous articleरमाबाईंनी आपल्या जीवनात केलेला संघर्ष व बलिदान प्रेरणादायी
Next articleपाणी टंचाई विरोधात दिंद्रुडकर आक्रमक; हंडे घेऊन बीड – परळी महामार्गावर केला रास्ता रोको
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here