Home सामाजिक रमाबाईंनी आपल्या जीवनात केलेला संघर्ष व बलिदान प्रेरणादायी

रमाबाईंनी आपल्या जीवनात केलेला संघर्ष व बलिदान प्रेरणादायी

83
0

आशाताई बच्छाव

IMG_20240207_055741.jpg

रमाबाईंनी आपल्या जीवनात केलेला संघर्ष व बलिदान प्रेरणादायी

रमाबाई यांचा जन्म दाभोळ जवळील वंणद गावातील एका गरीब कुटुंबात झाला होता.त्यांच्या वडिलांचे नाव भिकू धुत्रे (वलंगकर) व आई रुक्मिणी भिकू धुत्रे यांच्या सह त्या आपल्या दाभोळजवळील वंणदगावात राहत होत्या. त्यांचे वडिल भिकू धोत्रे हे दाभोळ बंदरातील माश्यांनी भरलेल्या टोपल्या बाजारापर्यंत पोचविण्याचे काम करीत असतं.रमाबाई यांचे कुटुंब एक मोठ कुटुंब होतं. त्यांच्या परिवारात आई वडिलांसोबतच त्यांना तीन बहिणी व एक भाऊ होता. मोठ्या बहिणीचे लग्न झाले होते. रमाबाई लहान असतांना त्यांच्यावर खूप मोठे संकट येऊन पडले. त्यांच्या आई रुक्मिणी धुत्रे यांचे आजारपणामुळे निधन झाले. त्यामुळे रमाबाई यांच्या कोवळ्या मनावर खूप मोठा आघात झाला. कालांतराने त्यांच्या वडिलांचे सुद्धा निधन झाले.आयुष्याच्या कोवळ्या वयातच त्यांच्यावर इतका मोठा प्रसंग उद्भवला होता. कारण त्यांच्यावर आपल्या लहान भाऊ आणि बहिणीची जबाबदारी आली होती. यानंतर त्या आपल्या वलंगकर काका व गोविंदपुरकर मामा यांच्यासोबत मुंबईतील भायखळा मार्केटच्या चाळीत राहायला गेले.
रमाबाई आपल्या भावंडासोबत मुंबईत आपल्या काका व मामा सोबत राहत होत्या. त्या काळी बालविवाह प्रथा समाजात रूढ होती. त्यामुळे त्यांचा विवाह त्यांच्या लहानपणीच करण्यात आला होता. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे वडिल सुभेदार रामजी आंबेडकर हे आपला मुलगा भीमराव आंबेडकर यांच्याकरिता मुलगी पाहत होती त्यांना भायखळा येथे लग्नाची मुलगी आहे असे समजले. त्यांनी वलंगकर यांना लग्नाची मागणी केली. रमाबाई व भीमराव आंबेडकर यांचे लग्न भायखळ्याच्या भाजी मार्केटमध्ये ई.स. १९०६ साली झाले. लग्नाच्या वेळी भीमराव आंबेडकर यांचे वय १४ वर्षाचे तर, रमाबाई ह्या केवळ ९ वर्षांच्या होत्या. रमाबाईंनी आपल्या जीवनात खूप दु:ख सहन केलं आहे.
रमाबाई यांचे लग्न त्याकाळी बाल विवाह प्रथेनुसार करण्यात आले होते. लग्नाच्या काही वर्षानंतर बाबासाहेब ई.स. १९२३ साली आपले पुढील शिक्षण पूर्ण करण्यासाठी लंडनला गेले. यानंतर रमाबाई संपूर्णपणे एकट्या पडल्या, त्यांना जीवनात आपला उदरनिर्वाह करण्यासाठी खूप कष्ट सहन करावं लागलं. त्या जिद्दीने आपल्या दु:खांचा आणि अडचणींचा सामना करत होत्या.बाबासाहेबांच्या कार्यकर्त्यांनी त्यांना देऊ केलेली मदत रमाबाई यांनी नाकारली कारण, त्या एका स्वाभिमानी पतीच्या स्वाभिमानी पत्नी होत्या. रमाबाई आंबेडकर यांनी आपल्या जीवनात खूप मरण पहिली व ते पाहून त्याही थोड्या थोड्या मेल्या. कारण, लहानपणीच आई व त्यानंतर वडिल यांचा मृत्यू झाला. त्यानंतर लग्नाच्या अवघ्या ७ वर्षानंतर वडीलांसमान सासरे रामजी सुभेदार यांचा ई. स. १९१३ साली मृत्यू झाला.बाबासाहेब आंबेडकर अमेरिकेला असतांना ई.स.१९१४ ते १९१७ साली रमेश यांचा मृत्यू झाला. बाबासाहेब परदेशात आपल्या शिक्षणात मग्न असल्यामुळे रमाबाई यांनी त्यांना या बद्दल काहीच कल्पना दिली नाही. त्याचप्रमाणे ऑगस्ट १९१७ साली झालेला बाबांच्या सावत्र आई जिजाबाई यांचा मृत्यू, पाठोपाठ मुलगी इंदू, बाबासाहेबांचे मोठे बंधू आनंदराव व त्यांचा मुलगा गंगाधर यांचा मृत्यू अश्या प्रकारचे प्रसंग त्यांच्या जीवनात बाबासाहेबांच्या अनुपस्थित उद्भवले होते.
ई.स.१९२१साली रमाबाई यांच्या जीवनात सर्वात मोठ दुखद घटना घडली ती म्हणजे, बाबासाहेब आंबेडकर यांचा मुलगा बाळ गंगाधर, व ई.स.१९२६ मध्ये राजरत्न यांचा मृत्यू त्यांना पाहावा लागला. इतक सर्व त्यांच्या सोबत घडत असतांना देखील त्यांनी या बद्दल बाबासाहेबांना काहीच सांगितल नाही. घरातील एकेक जणांचा मृत्यू झाल्याने त्या एकट्या पडल्या होत्या.आपला उदरनिर्वाह करण्या करता त्या शेण गोवऱ्या तसचं सरपणासाठी वनवन फिरल्या. अश्या प्रकारे रमाबाई आंबेडकर यांनी कुणालाही चाहूल न होऊ देता, आपला व आपल्या मुलांचा सांभाळ करण्यासाठी त्या पहाटे सूर्योदयापूर्वी आणि रात्री आठ वाजल्यानंतर गोवऱ्या थापायला वरळीत जात असतं.रमाबाई आंबेडकर यांनी आपल्या जीवनात खूप कष्ट केलं होतं. त्याचप्रमाणे दु:ख देखील उपभोगले होतं. जीवनात केलेल्या अपार कष्टांमुळे त्यांचे शरीर पोखरून गेलं होतं. त्यांना आजार बळावला होता. ई.स. १९३५ साली त्यांचा आजार वाढतच गेला आणि मे १९३५ साली तर त्यांचा आजार खूपच विकोपाला गेल्याने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी नामांकित डॉक्टरांना पाचारण केले होते.त्यांच्या तब्येतीत कुठलीच सुधारणा होत नव्हती. बाबासाहेब त्यांच्या जवळ बसून राहत असत. असेच काही दिवस सुरू असतांना २७ मे १९३५ साली रमाबाई आंबेडकर यांची आजारपणामुळे प्राणज्योत मावळली. खरच, यातून अस म्हणता येईल की रमाबाई यांनी आपल्या जीवनामध्ये केलेला संघर्ष आणि त्यांनी दिलेलं बलिदान हे खूप मोठं आहे.

सौ रिनाताई राजेंद्र सोनवणे
सदस्य विठ्ठल रखुमाई अध्यात्मिक विचार मंच महाराष्ट्र राज्य शिक्रापूर पुणे

Previous article७ ला भंडारा जिल्हा निवड चाचणी स्पर्धा
Next articleधक्कादायक घटना परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here