Home बुलढाणा कृषी प्रदर्शनाकरिता जाणाऱ्या ऑटोचा अपघात उपचारा दरम्यान पत्नीचा मृत्यू तर पती जखमी

कृषी प्रदर्शनाकरिता जाणाऱ्या ऑटोचा अपघात उपचारा दरम्यान पत्नीचा मृत्यू तर पती जखमी

34
0

आशाताई बच्छाव

IMG_20240127_060743.jpg

कृषी प्रदर्शनाकरिता जाणाऱ्या ऑटोचा अपघात
उपचारा दरम्यान पत्नीचा मृत्यू तर पती जखमी

राजुर घाटातील दुर्दैवी घटना
युवा मराठा न्यूज मोताळा तालुका प्रतिनिधी संजय पन्हाळकर

मोताळाः– कृषी विभागाच्या वतीने राजश्री आयुर्वेदिक महाविद्यालय मेहकर समोरील प्रांगणात दिनांक २५ ते २९ जानेवारी २०२४आयोजित कृषी महोत्सव व भव्य कृषी प्रदर्शनी करिता स्वतःच्या ऑटोने जात असलेल्या गणपती नगर मोताळा येथील रहिवासी रेखाबाई सुरडकर व पापट, सांडोया, कुरडया चा व्यवसाय करणाऱ्या आपल्या पती सोबत जात असतांना बुलढाणा घाटात देवीच्या मंदिराजवळ ऑटो पलटी झाल्याची घाटात आज गुरवार दिनांक २५ जानेवारी २०२४ रोजी सकाळी ७:३० वाजेच्या सुमारास घडली. याबाबत सविस्तर वृत्त असे की मोताळा येथील पापट, सांडोया, कुरडया चा व्यसाय करणाऱ्या रेखा बाई सुरेश सुरडकर ह्या आपले पती सुरेश सुरडकर यांच्या सह मेहकर येथे कृषी विभागाच्या वतीने आयोजीत करण्यात आलेल्या चार दिवशीय कृषी महोत्सव कृषी प्रदर्शनी करिता जात असताना बुलढाणा घाटातील देवीच्या मंदिरा जवळ त्याचा ऑटो एम. एच. १९ बियू१०६४ पलटी झाल्याची घटना घडली सदरच्या घटनेत जखमी रेखाबाई सुरडकर गंभीर जखमी झाल्याने यांना तात्काळ उपचारा करिता जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले परंतु उपचारा दरम्यान रेखाबाई सुरडकर वय ४२ वर्ष यांची प्राणज्योत मावळली तर जखमी सुरेश सुरडक र यांच्या पत्नी रेखाबाई सुरडकर यांचा पापड, सांडोया, कुरडया चा व्यवसाय होता. त्याच्या पश्चात पती, एक मुलगा एक मुलगी असा आप्त परिवार आहे. वृत्त लिहे पर्यत बोराखेडी पोलीस ठाण्यात कोणत्याही प्रकारचा गुन्हा दाखल करण्यात आलेला नव्हता.

Previous article१० हजाराची लाच घेताना महिला उपजिल्हाधिकाऱ्यांना बेड्या
Next articleअमरावती येथे महिला पोलीस अधिकाऱ्यावर महिलांचा हल्ला; ट्रान्सपोर्ट नगर येथील घटना.
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here