Home अमरावती अमरावती येथे महिला पोलीस अधिकाऱ्यावर महिलांचा हल्ला; ट्रान्सपोर्ट नगर येथील घटना.

अमरावती येथे महिला पोलीस अधिकाऱ्यावर महिलांचा हल्ला; ट्रान्सपोर्ट नगर येथील घटना.

44
0

आशाताई बच्छाव

IMG_20240127_061131.jpg

अमरावती येथे महिला पोलीस अधिकाऱ्यावर महिलांचा हल्ला; ट्रान्सपोर्ट नगर येथील घटना.
———–
दैनिक युवा मराठा
पी एन देशमुख
अमरावती जिल्हा विभागीय संपादक.
अमरावती
नागपुरी गीत पोलीस ठाण्यात कार्यारत एका महिला पोलीस अधिकाऱ्यांवर एका महिलेनेच हल्ला केला. बचावासाठी पुढे सरसावलेले त्यांच्या रायटर अमलदाऱ्याच्या डोळ्यात नखाने वोरबडले.२० जानेवारी रोजी रात्री एकच्या सुमारास ट्रान्सपोर्ट नगर अमरावती येथे हा प्रकार घडला. याप्रकरणी, जखमी महिला पोलीस अधिकाऱ्यांच्या तक्रारीवरून नागपुरी गेट पोलिसांनी संबंधित आक्रमक महिला विरुद्ध सरकारी कामकाजात अडथळा निर्माण केल्याचा गुन्हा दाखल करण्यात जानेवारी रोजी रात्री नागपुरी गीत ठाण्यात कार्यरत महिला पोलीस अधिकारी रायटर व चालक अंमलदाराचा पेट्रोलिंग करीत होत्या. त्यावेळी २० जानेवारी रोजी उशिरा रात्री एकच्या सुमारास त्यांना २५ते३० वर्ष वया गटातील एक महिला तिच्या दुचाकी दिसली. त्यामुळे पोलीस अधिकारी महिलेने तिला काही मदत हवी का, अशी विचारणा केली, त्यावर माझ्या गाडीत पेट्रोल नाही. तुम्ही मला काय मदत करणार, येथून निघून जा, अशी उद्धटपणे उत्तर दिले. तरी देखील महिला पोलीस अधिकाऱ्यांनी तिला स्वतःचा परिचय देत परत तिला मदतीबाबत विचारणा केली. तिला समजावण्याचा प्रयत्न केला असता तिने महिला अधिकाऱ्यावर हल्ला केला. त्यांच्या रायटरला देखील इजा पोचली. ती ऐकण्याच्या स्थितीत नव्हती. व तिला तिचे नाव व पत्ता सांगण्याचा विचारणा केली असता ती सांगण्यास नकार देत होती. ती योग्य माहिती न देत असल्यामुळे पोलीस स्टेशनला कॉल करून दोन महिला अंमलदार बोलावून तिला पोलीस ठाण्याच्या वाहनात बसविण्यास सांगितले असता, तिने पुन्हा वाद करत नकार दिला. अखेर तिला रात्री १.५०च्या सुमारास पोलीस ठाण्यात आणण्यात आले. तेथे देखील तिने स्वतःचे नाव सांगण्यास नकार देऊन उडवा उडवीची उत्तर दिली. महिला अंमलदारांनी तिला विश्वासात घेऊन तिची ओळख पटविल्यानंतर रुग्णालयात तिची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. नाव पत्त्यास शंका आल्याने तिला तिच्या आधार कार्ड बाबत विचारणा केली असता तिने आधार कार्ड दिले त्यावरून तिची खरी ओळख पटली. ती घटस्फोटीत असल्याचे देखील समोर आले. तिच्या नातेवाईकांना बोलावून तिला त्यांच्याकडे सुपुत्र करण्यात आले.

Previous articleकृषी प्रदर्शनाकरिता जाणाऱ्या ऑटोचा अपघात उपचारा दरम्यान पत्नीचा मृत्यू तर पती जखमी
Next articleगजानन मारणे पार्थ पवारांच्या भेटीला, राजकीय वर्तुळात खळबळ….
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here