Home उतर महाराष्ट्र भिलिस्थान लायन सेना च्या वतीने वासखेडीत ग्रामिण क्रिकेट स्पर्धेचे आयोजन

भिलिस्थान लायन सेना च्या वतीने वासखेडीत ग्रामिण क्रिकेट स्पर्धेचे आयोजन

77
0

आशाताई बच्छाव

IMG-20220601-WA0031.jpg

भिलिस्थान लायन सेना च्या वतीने वासखेडीत ग्रामिण क्रिकेट स्पर्धेचे आयोजन

वासखेडी – येथील जय एकलव्य स्टेडियम येथे भिलीस्थान लायन सेनेचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष तथा भारतीय किसान सेना प्रदेश महासचिव आदीवासी नायक मा, दादासो,पंडीतभाऊ तडवी यांच्या अध्यक्षतेखाली क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करून ,उदघाटन करण्यांत आले, पहिला सामना वाघंबा विरूध्द कळंबीर असा सामना मान्यवरांच्या हस्ते खेळवण्यांत आला,कार्यक्रमावेळी कांतिलालजी जाधव ( जिल्हाध्यक्ष मुक्त सेल भिलीस्थान लायन सेना नंदुरबार )मा,सुभाषजी नेरकर (प्रदेश कार्याध्यक्ष भिलिस्थान लायन ) रवि मोरे (धुळे जिल्हाध्यक्ष भिलिस्थान लायन) मा,दिपकभाऊ जाधव पत्रकार (धुळे जिल्हाध्यक्ष रयत महाराष्ट्र जनरल कामगार संघटना म.रा.) वासखेडी चे युवा नेते मा,जगदीश सावळे तसेच भिलिस्थान लायन युवा सैनिक व परीसरातील क्रिकेट प्रेमी उपस्थित होते, यात ३१संघाना प्रवेश देण्यात आला होता प्रथम पारीतोषिक १६हजार व ट्रॉफी, द्वीतीय पारितोषिक ११हजार व ट्रॉफी, तृतीय पारितोषिक ७हजार व ट्रॉफी देण्यांत येणार आहे,
प्रसंगी बोलतांना पंडीतदादा म्हणाले की, क्रिकेट हा राष्ट्रीय खेळ आहे,या खेळाच्या माध्यमातुन अनेक अष्टपैलू खेळाडु या भुमातेतुन जन्मास आले आहेत,प्रत्येक युवकाने खेळाचे महत्व समजुन घेतले पाहिजे,नक्किच परीसरातुन अष्टपैलू खेळाडु तयार झाल्याशिवाय राहणार नाही, आपल्या परीसराचे,तसेच जिल्हयाचे, मग देशाचे नाव उंचवल्याशिवाय राहणार नाही,आपली आवड,आपली जिद्द या दोन गोष्टींवर भर घातली तर यश हे कोणीही हिरावून घेऊ शकत नाही हे तेवढेच सत्य आहे,परीसरातील युवकांची खेळातील उत्सुकता बघता परस्थिती अभावी अपुर्तता असल्या कारणास्तव आदीवासी परीसरातील क्रिकेट प्रेमी मागासलेला आहे,शासनाने योग्य मार्गदर्शक आधारस्तंभाचे आयोजन अथवा मेळावे ,स्पर्धा आदींचे आयोजन केल्यास जिल्ह्याच नाव पुढे गेल्याशिवाय राहणार नाही ही मी ग्वाही देतो,
तसेच गावातील क्रिकेट प्रेमी व भिलिस्थान लायन युवा संघ,आयोजक महेन्द्र भवरे,विलास माळचे,भगवान मोरे,दिनेश पवार,अजय ठाकरे,राहुल सोनवणे ,आनंदा भवरे,भारमल,भवरे,विजय भवरे,करन माळचे,राजु पवार,दादाजी सोनवणे,शरद भवरे,अनिल सोनवणे,
संजय भवरे,शंकर सोनवणे,तसेच ग्रामस्थ संजय भवरे,नानाजी सोनवणे,बारकु भवरे,दत्तुदादा बच्छाव, ज्येष्ठ नागरीक शामराव कुवर आदी उपस्थित होते,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here