Home पुणे राजगड” ची तंटबंदी आमदार संग्राम थोपटे यांनी कायम राखली कारखान्याच्या सर्व जागांवर...

राजगड” ची तंटबंदी आमदार संग्राम थोपटे यांनी कायम राखली कारखान्याच्या सर्व जागांवर काँग्रेस विजयी!

54
0

आशाताई बच्छाव

IMG-20220531-WA0068.jpg

“राजगड” ची तंटबंदी आमदार संग्राम थोपटे यांनी कायम राखली
कारखान्याच्या सर्व जागांवर काँग्रेस विजयी!

भोर प्रतिनिधि जीवन सोनवणे
भोर (जि. पुणे) : भोर तालुक्यातील राजगड सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत आमदार संग्राम थोपटे यांच्या नेतृत्वाखाली सत्ताधारी काँग्रेसचे सर्वच्या सर्व १७ उमेदवार विजयी झाले आहेत. काँग्रेसकडून राष्ट्रवादी आणि भाजप उमेदवारांचा दारुण पराभव झाला. यामध्ये १० उमेदवार अगोदरच बिनविरोध झाले होते, तर निवडणुकीत सात जणांनी भाजप आणि राष्ट्रवादीच्या उमेदवारास धूळ चारून विजय मिळविला. स्थापनेपासून वर्चस्व असलेल्या राजगडची तंटबंदी थोपटे यांच्या पुढच्या पिढीनेही म्हणजे आमदार थोपटे यांनी कायम राखली आहे.
काँग्रेसचे माजी मंत्री अनंतराव थोपटे यांनी स्थापन केलेल्या या राजगड सहकारी साखर कारखान्यावर स्थापनेपासूनच काँग्रेसचे पर्यायाने थोपटे घराण्याचे वर्चस्व राहिलेले आहे. अनंतराव थोपटे यांच्यानंतर आमदार संग्राम थोपटे हेही कारखान्याची धुरा मोठ्या चाणाक्षपणे संभाळत आहेत, त्याचा प्रत्यय याच निवडणुकीत विरोधकांसह संपूर्ण पुणे जिल्ह्याला आला. कारखान्याच्या 17 जागांपैकी काँग्रेसचे 10 उमेदवार अगोदरच बिनविरोध निवडून आले होते, उर्वरीत तीन गटांमधील ७ जागांसाठी 11 उमेदवार रिंगणात होते. यामध्ये काँग्रेसचे 7, राष्ट्रवादीचे 3 आणि भाजपच्या एका उमेदवाराचा समावेश होता. मतदानानंतर काँग्रेसचे सातही उमेदवार विजयी झाले.
निवडणुकीनंतर बोलताना आमदार संग्राम थोपटे म्हणाले की, भोर तालुक्यातील राष्ट्रवादी व भाजपाच्या पदाधिका-यांनी राजगड कारखान्याची निवडणूक हेतूपुरस्कर लादली असून त्या पदाधिकाऱ्यांनी स्वतः रिंगणात न उतरता इतरांना पुढे केले. खरे तर विरोधकांच्या स्वयंघोषीत पदाधिकाऱ्यांनी रिंगणात उतरायला हवे होते. कारखान्याच्या सभासदांनी विरोधकांना त्यांची जागा दाखवून दिली आहे. छाननीत उमेदवारी अर्ज बाद केल्यानंतर अपिलात राष्ट्रवादीच्या ११ उमेदवारांचे अर्ज वैध ठरले. तरीदेखील त्यापैकी ७ उमेदवारांनी माघार घेतली आणि केवळ तीनच उमेदवारांनी निवडणूक लढवली. त्यामुळे निवडणूकच्या खर्च होऊन कारखान्याला आर्थिक संकटात आणायचे काम विरोधकांनी केले आहे, असे आमदार संग्राम थोपटे यांनी सांगितले.
सकाळी ९ वाजता मतमोजणी सुरु झाल्यनंतर दुपारी तीन वाजता सर्व गटांचे निकाल हाती आले. निकालानंतर आमदार संग्राम थोपटे यांच्यासह सर्व विजयी उमेदवारांचा कॉग्रेसच्या वतीने सत्कार करण्यात आला. गुलालाची उधळण करीत आमदार संग्राम थोपटे यांनी वाजतगाजत चौपाटी परिसरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून मतदारांचे आभार मानले.

बिनविरोध उमेदवार पुढील प्रमाणे- गट क्रमांक ३ सारोळा-गुणंद-खंडाळा – किसन दौलतराव सोनवणे व दत्तात्रेय दिनकर चव्हाण.गट क्रमांक ४ कापूरव्होळ-वेळू-हवेली – विकास नथुराम कोंडे, शिवाजी खंडेराव कोंडे. मतदारसंघ ब वर्ग सहकार उत्पादक बिगर उत्पादक संस्था व पणन संस्था – आमदार संग्राम थोपटे. अनुसुचित जाती जमाती – अशोक कोंडीबा शेलार. महिला राखीव प्रतिनिधी – सुरेखा अमोल निगडे व शोभा हरिभाऊ जाधव. इतर मागास प्रवर्ग – संदीप किशोर नगीने. भटक्या विमुक्त जाती जमाती- चंद्रकांत रामचंद्र सागळे.
निवडणुकीतील विजयी झालेले उमेदवार व कंसात मिळालेली मते – गट क्र. १ भोर देवपाल – सुभाष मारुती कोंढाळकर (5 हजार 117) व उत्तम नामदेव थोपटे(4 हजार 998). गट क्रमांक २ येवली-हातवे बु – सुधीर चिंतामण खोपडे (4 हजार 649), सोमनाथ गणपत वचकल (4 हजार 870), पोपटराव नारायण सुके (4 हजार 942). गट क्रमांक ५ रुळे-वरसगाव-पानशेत – दिनकर सोनबा धरपाळे (5 हजार 277) व प्रताप धोंडीबा शिळीमकर(5 हजार 196). राष्ट्रवादीचे उमेदवार रामदास किसन गायकवाड, रामचंद्र पर्वती कुडले व पंडीत रघुनाथ बाठे यांचा पराभव झाला असून त्यांना अनुक्रमे 615, 639 व 405 मते मिळाली आहेत. तर भाजपाचे अमृत विलास बांदल यांचा पराभव झाला असून त्यांना 884 मते मिळाली.

Previous articleभिलिस्थान लायन सेना च्या वतीने वासखेडीत ग्रामिण क्रिकेट स्पर्धेचे आयोजन
Next articleगावातील पाणीटंचाई करीता शासन उपाय योजना जाहीर
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here