• Home
  • आजपासून घरगुती गॅस सिलेंडर महागले

आजपासून घरगुती गॅस सिलेंडर महागले

  • 🛑आजपासून घरगुती गॅस सिलेंडर महागले 🛑
    मुंबई 🙁 साईप्रजित मोरे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )

मुंबई ⭕ एलपीजी सिलेंडरची किंमत सोमवारपासून वाढली आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर एलपीजीच्या किंमती वाढल्यामुळे भारतात एलपीजीच्या किंमती वाढविण्यात आल्या आहेत. राजधानी दिल्लीत विनाअनुदानित १४.२ किलो सिलेंडर ११.५० रुपयांनी महागला आहे. इंडियन ऑईलच्या वेबसाइटनुसार, आधी दिल्लीत याची किंमत ५८१.५० रुपये होती, जी आता प्रति सिलेंडर ५९३ रुपये झाली आहे. त्याचप्रमाणे कोलकातामध्येही आता याची किंमत ५८४.५० वरुन ६१६ रुपये झाली आहे. कोलकातामध्ये १४.२ किलो विनाअनुदानित एलपीजी सिलेंडरचे दर ३१.५ रुपयांनी वाढले आहेत. दरातील ही वाढ 1 जूनपासून लागू झाली आहे.

मुंबईत विनाअनुदानित गॅस सिलेंडरच्या किंमतीत ११.५० रुपयांनी वाढ झाली आहे. सिलेंडरची किमत ५७९ वरुन आता ५९०.५० रुपये झाली आहे. चेन्नईत विनाअनुदानित गॅस सिलेंडरच्या किंमतीत ३७ रुपयांनी वाढ झाली आहे. सिलेंडरची किमत ५६०.५० वरुन ६०६.५० रुपये झाली आहे.

पंतप्रधान उज्ज्वला योजनेच्या लाभार्थींना कोणताही त्रास होणार नाही

पंतप्रधान उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांवर एलपीजी सिलिंडरच्या किंमती वाढीचा कोणताही परिणाम होणार नाही. पीएमयूवायच्या लाभार्थ्यांना ३० जूनपर्यंत एक विनामूल्य सिलेंडर मिळेल. अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेंतर्गत उज्ज्वला योजनेतील लाभार्थ्यांना तीन महिन्यांसाठी मोफत एलपीजी सिलेंडर देण्याची घोषणा केली होती.

१९ किलो गॅस सिलिंडरही महागला

याशिवाय १ जूनपासून १९ किलो एलपीजी गॅस सिलेंडरच्या किंमतीही वाढल्या आहेत. दिल्लीत १९ किलो गॅस सिलिंडरच्या किमती ११० रुपयांनी वाढविण्यात आल्या असून गॅस सिलेंडर ११३९.५० रुपये झाला आहे. त्याचप्रमाणे कोलकातामध्येही या गॅस सिलिंडरची किंमत १०७.५० रुपयांनी वाढून ११९३.५० रुपये झाली आहे. मुंबईत या सिलिंडरची किंमत १०९.५० रुपयांनी वाढून १०८७.५० रुपये झाली आहे.⭕

anews Banner

Leave A Comment