Home माझं गाव माझं गा-हाणं सटाणा येथे अखेर बेवारस महिलेच्या वारसदाराचा लागला शोध

सटाणा येथे अखेर बेवारस महिलेच्या वारसदाराचा लागला शोध

106
0

*सटाणा येथे अखेर बेवारस महिलेच्या वारसदाराचा लागला शोध*
सटाणा,(जयवंत धांडे प्रतिनिधी युवा मराठा न्युज)- सटाणा तालुक्यातील एक वयोवृध्द महिला गेल्या काही दिवसापुर्वी पायी भटकत फिरत असताना मोरेनगरजवळ जखमी अवस्थेत पडलेली आढळून आल्याने सटाणा येथील सामाजिक कार्यकर्ते श्याम बगडाणे व त्यांच्या मित्रपरिवाराने सदर आजीला उपचारासाठी सटाणा ग्रामीण रुग्णालयात दाखल केलेले होते.अखेर त्या आजीचा मृत्यू झाल्याने पोलिसापुढे व सामाजिक कार्यकर्तेपुढे त्या आजीचा शोध लावण्याचे आव्हान होते.त्यातच सोशल मिडीयावरील व्हाँटसअप ग्रुपचा मोठाच आधार या मंडळीना मिळाला.
याबाबत सविस्तर प्राप्त माहिती अशी की,धन्याबाई मोतीराम पवार हि महिला पायी फिरत असताना जखमी अवस्थेत आढळून आल्याने तिच्यावर रुग्णालयात सामाजिक कार्यकर्ते यांच्या सहकार्याने उपचार सुरु असतानाच त्या महिलेचे उपचारा दरम्यान निधन झाले.तिची ओळख पटत नसल्याने व्हाँटसअप ग्रुपवर त्या महिलेचे फोटो टाकून ओळख पटविण्याचा प्रयत्न उपयुक्त ठरला.सामाजिक कार्यकर्ते श्याम बगडाणे,ठेंगोडा बीटचे हवालदार निरभवणे,पोलीस पाटील बागूल,विंचूरे गावाचे पोलिस पाटील बच्छाव यांनी शोध घेऊन सदरची आजी हि विंचूरे ता.सटाणा येथील आदिवासी वस्तीतील संतोष उतम पवार यांची आजी असल्याचा तपास लावुन सदर आजीचा मृतदेह रुग्णवाहिकेतून नातेवाईकांच्या ताब्यात दिला.त्यामुळे सटाणा पोलिस,सटाणा तालुका पोलिस पाटील संघटना व सामाजिक कार्यकर्ते श्याम बगडाणे यांचे विशेष कौतुक होत आहे.

Previous articleमहाराष्ट्र बोर्डाचे १०वी आणि १२वी निकाल या तारखेला लागण्याची शक्यता!
Next articleआजपासून घरगुती गॅस सिलेंडर महागले
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here