Home युवा मराठा विशेष महाराष्ट्र बोर्डाचे १०वी आणि १२वी निकाल या तारखेला लागण्याची शक्यता!

महाराष्ट्र बोर्डाचे १०वी आणि १२वी निकाल या तारखेला लागण्याची शक्यता!

107
0

🛑 महाराष्ट्र बोर्डाचे १०वी आणि १२वी निकाल या तारखेला
लागण्याची शक्यता! 🛑
( विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )

महाराष्ट्र :⭕यंदा कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर दहावीच्या परीक्षेत शेवटचा म्हणजे भूगोलाचा पेपर रद्द करण्यात आला होता ज्याचे गुण आता सरासरीनुसार देण्यात येणार आहेत. तर लॉकडाउन लागू होण्याआधी 12 वी बोर्ड परिक्षेच्या सर्व विषयांचे पेपर पूर्ण झाले होते. यामुळे या विद्यार्थ्यांना किंचित दिलासा आहे. अद्याप महाराष्ट्र शिक्षण मंडळाच्या परीक्षा निकालांची तारीख जाहीर झाली नसली तरी जेव्हा निकाल लागेल तेव्हा तो कसा पाहायचा? कुठे पाहायचा? असे प्रश्न तुम्हाला पडू नयेत म्ह्णून mahresult.nic.in वर हे निकाल कसे पाहावेत हे आपण जाणून घेऊयात.

महाराष्ट्र 10 वी आणि 12 वी बोर्डाचा निकाल mahresult.nic.in या अधिकृत संकेतस्थळावर पाहण्यासाठी या सोप्प्या स्टेप्स लक्षात ठेवा:

-निकाल पाहण्यासाठी प्रथम mahresult.nic.in या संकेतस्थळाला भेट द्या

-Board Results ऑप्शनवर क्लिक करा

-MSBSHSE रिजल्ट पेज तुमच्या समोर सुरु होईल

– विद्यार्थ्याने त्याचा क्रमांक आणि अन्य तपशील द्यावा

-रिजल्ट पाहण्यासाठी तेथे देण्यात आलेल्या ऑप्शनवर क्लिक करावे

-रिजल्ट दिसल्यावर त्याची प्रत Save करा.
दरम्यान, यंदाचे शैक्षणिक वर्ष सुद्धा 15 जून पासून सुरु करण्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली होती. कोरोना सारख्या परिस्थितीत शिक्षणाला अडथळा येत नाही हे महाराष्ट्राने देशाला दाखवून द्यावे आरोग्याची काळजी घेऊन जिथे शाळा सुरू करता येणे शक्य आहे तिथे त्या सुरू करणे,जिथे ऑनलाईन शक्य आहे तिथे त्यापद्धतीने का होईना पण शिक्षण सुरू झाले पाहिजे असे मत अलीकडे मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केले होते.

Previous articleरेशनकार्ड नसलेल्यांना मिळणार स्वस्त धान्य !
Next articleसटाणा येथे अखेर बेवारस महिलेच्या वारसदाराचा लागला शोध
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here